web-ads-yml-728x90

Breaking News

श्रमिक सोसायटीत आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

सामाजिक सलोखा जपून आदर्श निर्माण करणा-या खारघर सेक्टर २० मधील २०० घरांच्या सर्वांत मोठया श्रमिक सोसायटीमध्ये दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१वा जयंती महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते. याचा लाभ सोसायटी व आसपासच्या जवळ-जवळ २५० गरजूंनी घेतला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा भिम व्याख्याते सुमेध भालेराव संगमनेरकर यांचे यावेळी बाबासाहेबांच्या जिवनावर क्रांतिकारी व्याख्यान झाले. महिला, युवा, विद्यार्थी यांच्या विविध गुणदर्शन स्पर्धा, भिमगितांवर आधारीत नृत्य स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या.

       भारतीय संविधान प्रचारासाठी निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, चित्रकला इ. स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच आंबेडकर चळवळीचे अभ्यासक, ज्येष्ठ मराठी साहित्यिक ज. वि. पवार लिखीत भारतीय संविधाची ओळख या पुस्तकांचे प्रमुख पाहुणे, स्पर्धा विजेते, विद्यार्थी व उपस्थितांना वाटप करण्यात आले.

जयंतीमहोत्सवास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, श्रमिक सोसायटी, श्रमिक शिवजयंती उत्सव मंडळ, नवज्योती महिला मंडळ, श्रमिक उत्सव मंडळ यांचे कार्यकर्ते, युवा व महिला यांचे संयुक्तरित्या योगदान लाभले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल तळवणेकर, अमोल भगत, उमेश मुणगेकर, मंगेश येलवे, शिरीष वाघमारे, हरीष पगारे, आदर्श कांबळे, श्रीकांत वाघमारे, अंकित कांबळे, प्रिया वाडकर, मिनाक्षी साबळे, आरजू राऊळ यांनी विशेष मेहनत घेतली.

No comments