web-ads-yml-728x90

Breaking News

पालघर जिल्ह्याच्या मांडवी वनपरिक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव -  मुंबई

घर जिल्ह्याच्या मांडवी वनपरिक्षेत्रातील मौजे शिरवली पुर्णांकपाडा येथे वन विभागाच्या जागेत अतिक्रमण, उत्खनन, अनधिकृत बांधकाम, झाडे तोडणे, रस्ते बांधणाऱ्यांवर वन विभागाने तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.मंत्रालयातील दालनात मौजे शिरवली वनजमिनीवर सुरू असलेल्या कामासंदर्भात आयोजित बैठकीत राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक रामाराव, उपवनसंरक्षक एस.मधुमिता, पालघर जिल्हा नियोजन समिती सदस्य राजाराम मुळीक, अरविंद बेर्डे या बैठकीला उपस्थित होते.मांडवी वनपरिक्षेत्रातील चंद्रपाडा, खैरपाडा, टोकरेपाडा, मालजीपाडा या भागात असलेल्या वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून अवैधरित्या उत्खनन करणे, झाडे तोडणे, अनाधिकृत रस्ते बनविणे या तक्रारींबाबत वन विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशा सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी राज्यमंत्री श्री. भरणे यांनी दिल्या.

No comments