web-ads-yml-728x90

Breaking News

ठाण्याच्या रंगायतन मध्ये रंगला "लेक माहेरचा कट्टा".....! सामाजिक,उद्यौजक महिलाचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवुन सन्मान

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव,ठाणे

लेक माहेरचा कट्टा या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.सारिका प्रमोद ढाणे त्यांच्या सहकारी सौ.कविता कोंडभर सौ.वर्षा नांगरे सौ.पूनम दुसाने सौ.नीलम विसपुते सौ.कौसर शेख सौ.राजश्री थोरात यांनी आयोजित केलेल्या लेक माहेरचा कट्टा कार्यक्रमाचे आयोजन ठाणे गडकरी रंगायतन मध्ये पार पडला त्यामध्ये महाराष्ट्रातील हिरकणी समाजसेविका उद्यौजक विविध श्रेत्रात काम करणार्या महिलांना मान्यवराच्या हस्ते नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


      कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचालन जयश्री महाडिक यांनी केले.व्यासपिठावर महिला पोलिस अधिकारी श्रीमती.प्रियतमा मुठे प्रिया पांचाळ प्रणय विचारे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य स्वतंत्र संपादक पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार ज्योती एन शेलार आदी मान्यवर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी सांस्कृतीक मनोरंजन गिते नृत्य ओवी सादर करणार्या हिरकणीना सन्मानित करण्यात आले.यावेळी महिला पोलिस अधिकारी श्रीमती प्रियतमा मुठे श्रीमती प्रिया पांचाळ यांनी महिलांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

आज प्रत्येक श्रेत्रात महिलाचे योगदान आहे समाजसेवा उद्यौग व्यवसाय नोकरी पत्रकारिता अशाच सर्वच श्रेत्रात महिला कार्यरत आहेत प्रत्येक श्रेत्रात पुढे आहेत.

 सासर माहेर यामध्ये अंतर नाही लेक हीच उदयाची सुन,आई,सासू,आजी आणि प्रथम नात असते असं लेकीचं नातं त्यांचा एकरूप झालेलं हिरकणी रूप म्हणजे लेक माहेरचा कट्टा अशा सामाजिक उपक्रमाचे व्यासपिठ संपुर्ण महाराष्ट्रात तळागळातील महिलांचे मुलीच्या समस्या सोडवत आहेत गोरगरीबाना न्याय मिळवुन देत आहेत अशा सामाजिक संस्थेच्या कार्याचा कौतुक स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या महिला अध्यक्षा तथा विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.ज्योती नामदेव शेलार यांनी केले आहे.

   अशा कर्तृत्वान महिलाना प्रोत्सहान देण्यासाठी त्यांच्या सामाजिक कार्याची गती वाढवण्यासाठी आमची मिडीया आणि सामाजिक संस्था सदैव पाठीशी राहुन सहकार्य करेल अशा प्रतिक्रिया ज्योती शेलार यांनी दिल्या आहेत.लेक माहेरचा कट्टा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रमोद ढाणे सुजात पवार मयूर मोहिते सविता मोढवे सुजाता डुंबरे कांचन शिंदे नीलम पुजारी चेतन पाटील सौरभ पाटील श्रीकांत गायकवाड साहिल पगारे संध्या गाडेकर श्रीकांत गायकवाड लेखन आखाडे सौरभ म्हात्रे शुभांगी दळवी श्रध्दा संकपाल कल्पना संकपाल या सर्व सदस्यानी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री महाडिक निलम विसपुते यांनी केले.

No comments