web-ads-yml-728x90

Breaking News

कायदासाथी संस्थेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी;लोक सेवा ट्रस्ट वरळी येथे कार्यक्रमाचे आयोजन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

गणाई परिवाराचे एक पाऊल पुढे टाकत किशोर दादा जगताप ह्यांनी गोरगरीब लोकांना कायद्याची मदत पोहचवण्याच्या दृष्टीने कायदासाथी ची स्थापना केली. आज अनेक विभागात कायद्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर जागृती करण्याची आवश्यकता भासत आहे  परंतु , लोकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही अश्या वेळी कायदेशीर सल्ला लोकांपर्यन्त पोहचवण्याचे काम कायदासाथी करेल. तसेच जय भीम चित्रपट पाहताना आदिवासी दलित समाजाला न्याय मिळवून देणारा चंदृ आमच्या सर्वांच्या मनात घर करून जातो, आणि आपण डोळ्यात पाणी आणि टाळी वाजवल्या शिवाय थिएटर सोडत नाही, परंतु त्याच सोबत हे सत्य आपल्याच समाजाचा एक भाग आहे ज्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर काम करणं गरजेचं आहे ह्याची जबाबदारी मात्र त्या सिनेमगृहाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातच सोडून येतो.कायद्या सोबत लोकांचे एक अतूट नाते आहे. भारताचा नागरिक म्हणत असताना राज्यघटनेचा स्वीकार हा आपल्या जीवनाचा महत्वाचा घटक होऊन जातो. ज्यात आपल्या वाट्याला काही कर्तव्य येतात पण त्याचसोबत तितकेच अधिकार आणि हक्क ही घेऊन येतात. त्यातील माणसाची मूलभूत हक्क ,अधिकार हा त्याच्या जीवनाचा पाया मजबूत करतात. पण त्या साठी त्यांची योग्य माहिती असणे गरजेचे आहे.

 महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई, नेहरू, लोहिया यांना गोरगरीबांना ,शोषीतांना, वंचीतांना,पीडीतांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी कायद्याचे राज्य हवे होते.  व त्या करता तरुणांमध्ये ही जाणीव जागृती होण्याची गरज आहे असे आम्हाला प्रकर्षाने जाणवते. आणि ह्याच महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेवुन आम्ही तरुण कायदासाथी च्या माध्यमातून आज हे एक पाऊल पुढे टाकत आहोत . ज्यात किशोरदादा, डॉ. जितेंद्र जाधव, डॉ. आशिष भोसले आणि संपूर्ण गणाई परिवार पाठीशी उभे राहून लढण्याची ताकद देत आहे.

आजही बलात्कार झालेल्या महिला बदनामी होईल ह्या भीतीने तक्रार करत नाही आणि त्यामुळे बलात्कार करणाऱ्याचा आत्मविश्वास अजून बळकट होतो आणि तो इतर महिलांना त्याचा बळी करतो म्हणून योग्य वेळी तक्रार ही किती आवश्यक गोष्ट आहे हे आपल्या लक्षात येते. असे कायदासाथी अध्यक्षा ऍड. पूजा बडेकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मांडले.

     "यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान चे मानद व्यवस्थापक मा. दत्ता बाळ सराफ"  सर यांचे "बाबासाहेब व भारतीय संविधान" या विषयावर व्याख्यान झाले व त्यावर प्रश्नउत्तरे झाली. तसेच लोकसेवा ट्रस्ट चे कार्यवाह डॉ. आशिष भोसले व वैद्यकीय अधिकारी तसेच गणाई सल्लागार डॉ. जितेंद्र जाधव यांनी आलेल्या श्रोत्यांना उत्तम मार्गदर्शन केले अशी माहिती कायदासाथि कार्यवाह मंजिरी धुरी यांनी दिली.

       कायदासाथी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या "श्रीमती कमल वसंत जाधव"  भारतीय संविधान या स्पर्धेचे निकाल आज 14 एप्रिल 2022 बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त  जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत मुंबई, ठाणे,पालघर, पुणे, नाशिक ,सोलापूर, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, नांदेड, औरंगाबाद, बीड,धुळे अश्या महाराष्ट्र  भरातील विविध जिल्ह्यांमधून जवळपास 150 स्पर्धकांनी सहभागी होऊन या विषयाला चांगला प्रतिसाद दिले असल्याची माहिती कायदासाथी खजिनदार आरती गुप्ता यांनी दिली.

         या स्पर्धेत रोख पारितोषिक असून प्रथम क्रमांक संतोष जगताप (5000/-₹),   द्वितीय क्रमांक विशाल धनवटे (3000/-₹),   तृतीय क्रमांक प्रातिक पवार(1000/-₹),       उत्तेजनार्थ कपिलानंद कांबळे (500/-₹) ,   उत्तेजनार्थ दिवाकर बडगुजर (500/- ₹) असे विजेत्यांना देण्यात आले व इतर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले अशी माहिती कायदासाथी सदस्य राहुल भाट यांनी दिली.

      तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लोक सेवा ट्रस्ट चे उपाध्यक्ष राम भोसले यांनी केले असल्याची माहिती कायदासाथी सदस्य सलोनी तोडकरी यांनी दिली असून पुढे कायदासाथी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी विविध माध्यमातून कार्यरत राहील अशी माहितीही त्यांनी दिली.

 

No comments