web-ads-yml-728x90

Breaking News

महागाईचा फटका मुंबईच्या वडापावला; खवय्यांना लागणार ठसका

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

सर्वच गोष्टी महाग होत असताना आता या महागाईच्या शर्यतीत मुंबईचा प्रसिद्ध वडापाव (Vadapav Price Hike) देखील मागे राहिलेला नाही. या महागाईचा परिणाम मुंबईतील प्रसिद्ध वडापाववरही (Mumbai Vadapav Price Hike) झाला आहे. म्हणजेच आता त्याची चव थोडी महाग होईल. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे (Russia-Ukraine War) जगातील सर्व देशांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. युक्रेन आणि रशियासह श्रीलंका, पाकिस्तान, पाश्चात्य देशांसह भारतात महागाई वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की त्याचा परिणाम इतर गोष्टींवरही होणे साहजिक आहे. मुंबईतल्या सर्वसामान्यांचे जगणे असलेला वडापावदेखील आता महाग झाला आहे. देशात खाद्य तेलाच्या किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम मुंबईतील सर्वात स्वस्त खाद्यपदार्थ वडापाववरही झाला आहे. रुस-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेल आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे मुंबईत वडापावचे दर दोन ते पाच रुपयांनी वाढले आहेत. मुंबईत प्रत्येक गल्लीत वडापाव मोठ्या प्रमाणात विकला जातो. मात्र, आता पूर्वीच्या किमतीत वडापाव विकता येत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कारण तेल, मिरची आदी सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत.दादरमधील प्रसिद्ध वडापाव विक्रेते मनोज सहानी सांगतात की, "व्यावसायिक सिलिंडर आता सुमारे 200 रुपयांनी महागला आहे. सिलिंडरसाठी 2400 रुपये मोजावे लागतात. रिफाइंड तेल सुमारे 1500 ते 2400 रुपयांनी महागले आहे. मिरची 100 रुपये किलोपर्यंत विकली जात आहे. आम्ही वडापावचे दर वाढवले ​​नाहीत तर नुकसान होणार आहे."

 

No comments