web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सावधगिरी बाळगावी – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

आगामी सण उत्सव काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सुसज्ज राहून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवावा. या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेतयासाठी पोलिसांनी योग्य ती सावधगिरी बाळगावी, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमहावीर जयंतीहनुमान जयंतीगुड फ्रायडेइस्टर संडे या सर्व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाईअपर मुख्य सचिव आनंद लिमये,मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेअपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंहमुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलप्रधान सचिव संजय सक्सेनाअतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments