web-ads-yml-728x90

Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उत्साहात साजरी...!

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव  उल्हासनगर,ठाणे

मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर क्रमांक 3, जयंती उत्सव कमिटी यांच्या विद्यमाने व मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 जयंती, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती उत्सव उत्साहात साजरी करण्यात आली.भीमगिते,मान्यवरांचे मौलिक विचार आणि सूत्रसंचालिका च्या बहारदार शब्दांनी कार्यक्रमाची रंगत वाढली.

मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर क्रमांक ३,जयंती उत्सव कमिटी ,वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी वृंद आयोजित विश्वरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती ,छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती उत्सव दिनांक 14 एप्रिल 2000 22 रोजी मध्यवर्ती रुग्णालयाच्या ट्रामा केअर बिल्डिंगच्या बाजूला साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांना मानाचा फेटा, शाल,व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.बुद्धवंदना ने कार्यक्रमाची सुरुवात होऊन राहुल जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी भिम व बुद्ध गीते सादर करताना लोकांना आनंदाने डोलायला भाग पाडले.

तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे डेप्युटी इंजिनिअर विश्वकांत त्र्यंबक लोकरे ,प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल शिंदे व प्राध्यापक दामोदर मोरे,डॉ.सुमेध केदार या मान्यवरांनी मौलिक विचार व प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर रुग्णालयातील डॉक्टर शशिकांत दोडे, डॉ.मस्के, डॉ.उषा ससाने ,डॉ.निंभोरे, डॉ.सुहास मोहनाळकर, डॉ.मृणाली राहुड  ,डॉ. धीरज महांगळे, डॉ. सचिन शिंदे, मेट्रन छाया घोष इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

ललिता मोरे यांनी आपल्या भाषाशैलीचा प्रभावी वापर करून सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरीश बागडे,संजोग भराडे,नितीन गावंडे,गणेश पवार,तृप्ती तायडे,व प्रतिभा बागडे यांनी  सुंदर रांगोळीच्या स्वरूपात अशी सगळ्यांनी मेहनत  घेतली.रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे  यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले .शेवटी सर्व उपस्थितांच्या सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments