web-ads-yml-728x90

Breaking News

गुजरातमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ६ कामगारांचा जागीच मृत्यू

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

गुजरातमधील भरूच शहरातील एका केमिकल कंपनीत रविवारी रात्री भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत ६ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच एक कामगार बेपत्ता असल्याचे समजते. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या बेपत्ता कामगाराचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरूच येथे रविवारी रात्री उशिरा ओम ऑर्गेनिक या केमिकल कंपनीत अचानक स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचल्यानंतर स्फोटात ६ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याचं लक्षात आलं. काही वेळानंतर भरूच येथील पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले कामगार रिअॅक्टरच्या जवळ काम करत होते, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.

No comments