web-ads-yml-728x90

Breaking News

राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, राजद्रोहचा गुन्हा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

राणा दाम्पत्याला ( Rana couple sent to judicial custody ) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचणार, अशी घोषणा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet rana judicial custody ) आणि आमदार रवी राणा ( Rana couple Bandra court ) यांनी केल्याने शिवसेना विरुद्ध राणा असा सामना रंगला होता. या प्रकरणात राणा ( Ravi rana judicial custody ) दाम्पत्याला चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसांकडून शनिवारी अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याची शनिवारची रात्र जेलमध्येच गेली. त्यांना आज दुपारी मुंबईतील बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयात ( Rana couple bandra court news mumbai ) हजर करण्यात आले. न्यायालयाने राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली ( Rana couple judicial custody ) आहे. राणा दाम्पत्यांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. 29 एप्रिल रोजी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. नवनीत राणा यांची भायखला कारागृहात, तर रवी राणा यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी होणार आहे.

No comments