मुरबाड पोलिसांनी बॅग कटिंग करणाऱ्या चोरांची टोळी पकडली
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे
नजीकच्या काळात कल्याण ते टिटवाळा ,मुरबाड ते टोकवडे किन्हवली जीपने प्रवास करनाऱ्या महिलांना हेरून त्यांच्या सोबत सह प्रवाशी म्हणून प्रवास करून हात चलाखीने चैन उघडून,बॅग कटिंग करून त्यातील दागिने चोरी करत होते. त्याबाबत त्यांची गुन्हे कार्य प्रणालीचा अभ्यास करून पो नि पांढरे यांनी व गुन्हे प्रकटीकरण पथकातील PSI शेंडे,निचिते, मोरे, शिंदे, महिला पोलीस शिपाइ शिंदे यांनी साफ़ळा लावला त्यात तीन आरोपी पकडले गेले त्याचे तपासात त्यांनी टिटवाळा, मुरबाड, टोकवडे, किन्हवली पो स्टे हद्दीत गुन्हे केल्याचे उघड झाले त्यात आणखीन त्यांनी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास चालू आहे. मुरबाड पोलिसांनी केलेल्या ह्या कामगिरी मुळे प्रवाशा मध्ये आनंद व्यक्त होता आहे पोलिसांचे कौतुक होत आहे.
No comments