web-ads-yml-728x90

Breaking News

पेनड्राइव्ह बॉम्ब' येणार फडणवीसांच्या अंगलट..? व्हिडिओत छेडछाड केल्याची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी विधानसभेमध्ये पेनड्राईव्ह बॉम्ब ( Devendra Fadnavis Pen Drive Bomb ) टाकला. त्यामध्ये त्यांनी संदर्भ दिलेल्या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आली असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला ( Anil Gote Complaints Pen Drive Bomb ) आहे. या पेनड्राइव्हबाबत छेडछाड केल्याची तक्रार मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे केली असून, केलेली तक्रार ही गंभीर स्वरूपाची आहे. या प्रकरणात लवकरच चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले असल्याचं अनिल गोटे यांनी विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले

No comments