web-ads-yml-728x90

Breaking News

लहान मुलांचे तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ.मुकेश पाटील यांच्या कार्यशैलीची मुरबाड तालुक्यासह इतर तालुक्यात प्रशंसा...!

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड ,ठाणे

कोरोना कालावधीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक जनसामान्यांचे जीव वाचविण्यासाठी घेतलेल्या शपथेला निभवण्यासाठी डॉक्टरांनी सदैव प्रयत्न केल्याने आज अनेक नागरिकांचे जीव वाचविण्यात यश आले आहे.वेळोवेळी मार्गदर्शन आणि त्यांचे योगदान हे जगाच्या नकाशातच कोरले गेल्याने त्यांच्या कार्याची प्रशंसा महाराष्ट्रातच नव्हे तर जगात गाजली आहे.अशाच जगाच्या नकाशावर अनेक तज्ञ डॉक्टरांनी आपली शक्तीपणाला लावली होती त्याच धर्तीवर डॉक्टरांची महानता केलेल्या सामाजिक कार्यशैलीतून समोर आली आहे.अनेकांचे जीव वाचविण्यासाठी प्रशासक आणि डॉक्टर मागे सरले नाही त्यामुळेच आज अनेकांचे जीव वाचविण्यास मोठे यश आले आहे.ठाणे जिल्हयातील मुरबाड सारख्या ग्रामीण भागातही आरोग्य सेविका,डॉक्टरांनी गौरवशैलीचे काम केले.यामध्ये काही अधिकृत असलेले हॉस्पिटल,क्लिनीक यांनीही कोरोना काळात माणूसकी झरी जपली.त्याचबरोबर याच लहान बालकांनाही मुरबाड तालुक्याच्या बाहेर जाण्याची वेळ ही येऊ दिली नसून मुरबाड मधील लहान मुलांचे तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ.मुकेश पाटील यांच्या कार्यशैलीची प्रशंसा सर्वत्र मुरबाड तालुक्यासह इतर तालुक्यात होत आहे.मुरबाडमध्ये प्रामुख्याने गरिबातील गरिब घरातील लहान बालकांना चांगले उपचार मिळावे म्हणून डॉ.मुकेश पाटील यांनी माणूसकी झरी जपली आहे.तसेच डॉ.अविनाश कोठवल यांनीही चांगल्या प्रमाणे कार्य करत असल्याने त्यांच्या हॉस्पिटलमधून अनेक लहान बालक उपचार घेत बरे झाले आहेत.डॉ.मुकेश पाटील यांच्या माध्यमातून बालकांना उपचार मिळत असून त्यांना गोरगरिब जनतेने आपली पसंती दाखविली आहे.त्यांचे मुख्य वैशिष्टय म्हणजे रात्र-अपरात्री फोन केल्यास तात्काळ फोन उचलून अनेक बालकांच्या उपचारावर मार्गदर्शन करतात.हात लावून गुण पडते म्हणून डॉ.मुकेश पाटील यांना ग्रामीण भागातून शहरी भागात सर्वच नागरिक ओळखू लागल्याने तालुक्याच्या बाहेर लहान बालकं नागरिक नेत नसून आता मुरबाडमध्ये 24 तासाची सेवा मिळत असल्याने डॉ.मुकेश पाटील हे नाव सध्या चर्चेत आहेत.त्यांच्या कार्यपध्दतीत नर्स,स्टाफ,कर्मचारी हे बालकांच्या उपचाराकरिता प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास आले आहे.डॉ.मुकेश पाटील यांना शेकडो नागरिक बालकांच्या उपचाराचे मार्गदर्शन करिता फोन करित असून अनेक पालकांशी थेट प्रत्यक्षपणे व फोनवरून संवाद साधताना दिसले असल्याने त्यांच्याकडे लहान मुलांचे उपचाराकरिता येणारा पालक हा चिंतामुक्त होतो त्यामुळे येथे सर्व सुविधा उपलब्ध असून ग्रामीण भागातील बालक हा शहराकडे प्रस्थान करित नाही.डॉ.मुकेश पाटील हे अतिशय प्रेमळ स्वभावाचे असून त्यांच्या स्वाभावाला सर्व तालुक्यातील नागरिकांनी प्रशंसेचे स्वरूप दिले आहे.त्यांच्या डॉक्टरकीतून कुटूंब बाजूला सरून जनसामान्य जनतेला प्रथम प्राधान्य मिळाल्याने त्यांच्या समाजसेवी भूमिका सर्व नागरिकांना भावून गेली असून प्रत्येक नागरिकांना सन्मानाने समजावून सांगतांना दिसले आहे.आपल्याकडे येणारा प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटूंबातील सदस्य असून त्यांना सांभाळून घेणे हे माझे कर्तव्य आहे.त्यांच्या प्रत्येक अडचणीत मी सोबतच आहे अशी मनोधारणा मनात बाळगून एखाद्दया गरिब घरातील बालकांना मदत म्हणून त्यांचा सिंहाचा वाटा अमुल्य ठरला आहे.त्यांच्या तज्ञ रूपाला आणि उपचाराला पाहूनच सर्व नागरिक त्यांच्या बालकांच्या उपचारासाठी डॉ.मुकेश पाटील यांचे मुरबाड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येत असतात यातुन एकच म्हणता येईल ते म्हणजे बाळरोग तज्ञ डॉ.मुकेश पाटील यांच्या तज्ञेला सर्व नागरिकांनी आधार म्हणून पसंती दर्शविली आहे म्हणूनच आज त्यांच्याकडे उपरासाठी आलेला बालक हा बरे होऊनच जातो त्यामुळे त्यांच्या कार्याची प्रशंसा ही सर्वत्र होत असून सर्व बालकांना चांगले उपचार मिळावे म्हणून तत्पर राहिले आहेत.

No comments