दुसऱ्याच्या उत्कर्षाचा विचार केल्यास समाज प्रगती साधेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
समाजातील गरीब, उपेक्षित, निराश्रीत व्यक्तीला आपापल्या शक्तीनुसार मदत करण्याची परंपरा वैदिक काळापासून भारत देशात आहे. जे कार्य आपल्या वाट्याला आले आहे, ते सर्वोत्तम प्रकारे करणे ही देखील एक प्रकारे ईशसेवाच आहे. स्वतः सोबत दुसऱ्याच्या उत्कर्षाचा विचार केल्यास समाज प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या ३१ व्यक्तींना ‘समाजरत्न’ पुरस्कार करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
No comments