महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी आज युक्रेनमधून दिल्लीत दाखल; महाराष्ट्र सदनाद्वारे १२६ विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
गुरुवारी सात विशेष विमानांनी महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे गेल्या पाच दिवसांत १२६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.युद्धजन्य युक्रेन देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारची ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु आहे. देशातील अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांसह या मोहिमेंतर्गत २७ फेब्रुवारी २०२२च्या मध्यरात्रीपासून ते गुरुवार दुपारपर्यंत विशेष विमानांनी महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले आहेत.
No comments