web-ads-yml-728x90

Breaking News

जागतिक महिला दिनानिमित्त सोहम फाउंडेशन तर्फे महिलांसाठी हेल्थ किट वाटप;नील्स लेक व्ह्यू सोसायटी व सोहम फाउंडेशनतर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव पनवेल

नील्स लेक व्ह्यू सोसायटी, खांदा कॉलनी आणि सोहम फाउंडेशन खांदा कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज (रविवार दि.६ मार्च) जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोहम फाउंडेशन तर्फे महिलांसाठी हेल्थ किटचे वाटप करण्यात आले. नील्स लेक व्ह्यू सोसायटीचे चेअरमन व्यंकटेश अण्णा, सोहम फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजिरी गणेश मुळे, सचिव अँड आश्लेषा मुळे,खजिनदार राहुल पाठक, रुमा घोष, कीर्ती कुलकर्णी, रचना त्रिपाठी, प्रविणा आनंद यांच्यासह आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला. 

यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा, वक्तृत स्पर्धा, नृत्य स्पर्धा याप्रकाराच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

No comments