web-ads-yml-728x90

Breaking News

तर्पण पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते स्वावलंबी युवक-युवती सन्मानित

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

अनाथ असून देखील जीवनात शिक्षण प्राप्त करून प्रगतीची शिखरे गाठणाऱ्या ५ युवक युवतींना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज तर्पण युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.अठरा वर्षावरील अनाथ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, भावनिक व आर्थिक पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या तर्पण फाउंडेशनतर्फे राजभवन येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय संस्कृती संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ विनय सहस्रबुद्धे, तर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत भारतीय, श्रेया भारतीय व पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकर प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी अमृता करवंदे, अभय, सुलक्षणा, नारायण इंगळे व मनोज पांचाळ या युवक युवतींना तर्पण युवा पुरस्कार देण्यात आले.श्रीकांत भारतीय यांनी तर्पण संस्थेच्या माध्यमातून ५०० पेक्षा अधिक अनाथ युवक-युवतींना मदतीचा हात देऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचे केलेले कार्य स्तुत्य असून हे कार्य राष्ट्रव्यापी व्हावे असे उद्गार राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी काढले.

No comments