web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड शहराच्या सार्वगिण विकासासाठी कठीबध्द - रामभाऊ दुधाळे

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड ,ठाणे

गेले अनेक वर्षे मुरबाडच्या सामाजिक राजकीय चळवळीत उतुंग भरारी घेतलेले रामभाऊ दुधाळे यांना आमदार किसनराव कथोरे यांनी मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बसवले आहे.

   मुरबाड नगराध्यक्षपदावरून मुरबाड शहराचा नविन लुक तयार करून येथील नागरिकांना भेडसवणार्या समस्या सोडवुन विकास कामाना अधिकगती निर्माण करण्यासाठी कठीबध्द असल्याचे रामभाऊ दुधाळे यांचे प्रयत्न सुरू आहेत.मुरबाडमध्ये सिसिटिव्ही कॅमेरे,रस्त्यावर आडचण ठरणारे विद्युत पोल हाटवणे,दुकानदाराचे दर्शनी बोर्ड, गार्डन,फुटपाथ मोकळे यासह शहरातील नागरिक वस्त्या सुसज्ज करण्याचा मानस आहे.

  शासनाचे काम अधिकपारदर्शक करण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या योजनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.भविष्याचा वेध घेवुन येत्या 10 वर्षाचं काम 10 महिण्यात कसं होईल यासाठी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांच्या पुढाकाराने कामाची आखणी सुरू आहे.शहरातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावुन नवे प्रकल्प विकासकामे स्थानिक आमदाराच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्याचा मनोदय आहे.

  पाणी विज गृहप्रकल्प रस्ते त्याचप्रमाणे व्यवसायीकाना भेडसवणार्या समस्या याकडे अधिक लक्ष वेधले जाणार असल्याची नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांची संकल्पना समाधान कारक ठरणार आहे.

  एमआयडीसी मधील समस्या स्थानिकाना रोजगार कर आकारणी याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.अनेक वर्षे लोकांच्या विचाराच्या लोकप्रतिनिधीची गरज मुरबाड मध्ये होती त्याच लोकमताच्या विचाराचे तरूण नेतृत्व नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्याने मुरबाड नव्या विकासाच्या दृष्टीने एकमताचे सामाजिक नेतृत्व एकत्र येवू शकतात.राजकारणापेक्षा आपला माणूस आपली नैतिकता अधिकार सामाजिक कार्यमाना बळ देवु शकते अशी अपेक्षा करण्यास हारकत नाही अशी चर्चा आहे.

  प्रत्येक प्रभागातील नागरिकाना आपल्या समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे स्थानिक आमदाराच्या मार्गदर्शनाखाली नवे संकल्प कार्यक्रम राबवण्याच्या प्रयत्नात आहेत.स्वप्नज्योती टाईम्स वृत्तपत्र YML NEWS अर्थात युवा महाराष्ट्र लाईव टिव्ही न्युजशी संपर्क झाला असताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी मुरबाडच्या विकासासाठी सदैव कठीबध्द असल्याचे सांगितले.

No comments