web-ads-yml-728x90

Breaking News

उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई.. ६ कोटींची मालमत्ता जप्त

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी ) कारवाई केली ( ED Action Sridhar Patankar ) आहे. ईडीने त्यांच्या मेहुण्याची ६ कोटी ४५ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ( Pushpak Bulian Case ) ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट केले ( Kirit Somaiya Tweet ) आहे. ठाणे शहरातील नीलांबरी नामक प्रकल्पात ११ सदनिका आहेत. या मालमत्ता श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या असल्याचे समजते. पाटणकर हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांचे भाऊ आहेत. यापूर्वी याबाबत मनी लॉन्डरिंगप्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. याच प्रकरणात ईडीने कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पुष्पक ग्रुपचा हा एक भाग आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत ११ फ्लॅट्स असून, हे फ्लॅट्स नीलांबरी प्रोजेक्टमधील आहेत. हा प्रोजेक्ट श्री साईबाबा गृहनिर्माण प्रा. लि.चा आहे.

No comments