वनवणवा नियंत्रण जनजागृतीसाठीच्या चित्ररथाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे
जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ या संकल्पनेवर आधारित जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथ आणि एलईडी वाहनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, कृषी आयुक्त धीरज कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पर्यावरण तज्ज्ञ डॉ.महेश गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, माहिती अधिकारी सचिन गाढवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, माहिती सहायक गणेश फुंदे, संदीप राठोड आदी उपस्थित होते.
No comments