web-ads-yml-728x90

Breaking News

कल्याण मुरबाड माळशेज रेल्वे पुन्हा पटलावर;अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजितदादा पवार यांचा वादा

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

गेल्या 30 वर्षापासून कल्याण-मुरबाड-माळशेज-नगर रेल्वे व्हावी यासाठी प्रत्येक केंन्द्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा मांगण्या करून अखेर मुरबाड रेल्वे केंन्द्र आणि राज्य सरकारच्या डोळयासमोर कागदावर आणलेल्या माजी सिडको अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोदजी हिंन्दुराव(Pramod Hindurao) यांचे मनोबल महाविकास अघाडी सरकारने पुन्हा वाढवले आहेत.गेले कित्येक वर्षे तिच भुमिका ग्रामीण जनतेच्या सार्वगिण विकासात भर पाडुन देशात रेल्वे पासुन वंचित राहिलेल्या कल्याण मुरबाड माळशेज नगर ग्रामीण भागातील उदयाच्या भावी पिढीला शिक्षण नोकरी व्यवसायात आणि शेतकर्याना समृध्द करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत एकच मांगणी केंन्द्र आणि राज्य सरकारकडे लावून धरणार्या प्रमोदजी हिंन्दुराव यांचा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार(Ajit Pawar) यांनी पुन्हा अधिवेशनात कल्याण मुरबाड माळशेज रेल्वेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा आश्वसन दिल्याने मुरबाडच्या डोंगराळ ग्रामीण भागात आनंदाला बहर आला आहे.  गेल्या भाजपा शिवसेना सत्ता कालावधीत माजी मुख्यंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निधीची घोषणा मुरबाड मध्ये केली होती.गेली 10 वर्षे केंन्द्रात भाजपाची सत्ता आहे.आज पंचायत राज्यमंत्री यांच भिवंडी लोकसभेचा आहे.त्यांनीही अनेक वेळा घोषणा केल्या मागण्या झाल्या मात्र मुरबाड रेल्वेच्या कामाला गती आली नाही.नेहमीच रेल्वेचे गाजर म्हणुन उदघाटणाच्या उफळया फुटल्या लोक मुरबाड रेल्वे विसरून जाताना पुन्हा मुरबाड रेल्वेचे गेले 30 वर्षापुर्वी पासुन स्वप्न साकार करण्यास नेणारे प्रमोदजी हिंन्दुराव यांच्या प्रयत्नानी कल्याण मुरबाड माळशेज रेल्वे अर्थ संकल्पीय अधिवेशनात अजितदादा पवार यांनी पटलावर आणली आहे.

मुरबाड रेल्वे झाली पाहिजे मग कोणत्याही पक्षानी करो अशी भुमिका नेहमी प्रमोदजी हिंन्दुराव यांची आहे.शेकडो पत्रकार परिषदेत त्यांचा एकच ध्यास मुरबाड माळशेज नगर रेल्वे खरच त्यामध्ये काहीही राजकारण नाही महाराष्ट्र कोकणातील सगळी शहरे तालुके गांवे रेल्वेशी जोडली गेली आहेत मात्र सहयाद्रीपर्वताखाली असणार्या मरुबाड तालुका रेल्वेपासुन वंचित राहिला आहे.

   दोन लाखाच्यावर लोकसंख्या असणार्या मुरबाड तालुक्याला जोडुन वडनेरा समृध्दी पुणे गोवा नाशिक मुंबई असे देशाशी संपर्क होणारे रस्ते  झाले आहेत परंन्तु रेल्वे शिवाय येथील ग्रामीण भागाचा औद्यौगिक व्यवसायीक शौक्षणिक विकास शेती सक्षमीकरण त्याचबरोबर उच्चशिक्षण घेवुनही नोकर्या विना स्थानिक रोजंदारीवर कामकरणारा युवक केवळ रेल्वे विना एक पर्व गमावुन बसला आहे.

मुरबाड रेल्वे साठी खर्च किती येईल महत्वाचं नाही रेल्वेचे गाजर दाखवुन सत्तासिहासंन मिळवणार्याची नैतीक जबाबदारी आहे मात्र मुरबाड रेल्वेसाठी सत्ताकेंन्द्र मावळभुमिका घेतात ज्यांचे प्रयत्न त्यांच्या नावाचा गजर रेल्वे मार्गी लागे पर्यंत होतच राहिल मुरबाड माळशेज रेल्वे येण्यासाठी कल्याण शहाड आंबिवली टिटवाळा उल्हासनगर आंबरनाथ बदलापुर प्रमुख पर्याय असुन शेवटचा पर्याय वांगणी मुरबाड नाशिक कसारा हा रेल्वे मार्गासाठी पर्याय आहे.आज केंन्द्रात भाजपाची सत्ता आहे.मुरबाड मतदार संघाचा खासदार केंन्द्रीयमंत्री आहे.महाराष्ट्राचा रेल्वेमंत्री आहे स्थानिक आमदार भाजपाचा असुन त्यांना महाविकास अघाडीचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार निधी देण्यास पुढे आले आहेत मग कुठे आडली मुरबाड रेल्वे कल्याण मुरबाड माळशेज नगर रेल्वेसाठी कल्याण मुरबाड भागात प्रथम प्रमोदजी हिंन्दुराव यांनीच आजपर्यंत प्रयत्न सुरू ठेवले आहेत माळशेज घाटाच्यावर जुन्नर आळेफाटा औतुर नगर मधील काही कार्यकर्ते शेतकयांनी सुध्दा नेहमी मुरबाडनगर रेल्वेसाठी प्रयत्न केले आहेत.

  पुन्हा मुरबाडची रेल्वे पटलावर आणण्यासाठी प्रमोदजी हिंन्दुराव यांच्या प्रयत्नाचा आवाज विधीमंडळात धुमधुमत आहे.रेल्वे केंन्द्र सरकारच्या हातात आहे.त्यासाठी सगळयांनी राजकीय श्रेयवाद मतभेद विसरून मुरबाड रेल्वेचा स्वप्न साकार करावं अशी जनतेची अपेक्षा आहे.कदाचित बंद पडलेले भोगे सुरू होतील चर्चा श्रेयवाद मनोगत व्यक्त होईल होऊदया पण मुरबाड रेल्वे पटलावर येते त्यापेक्षा आनंद काय?

 

No comments