web-ads-yml-728x90

Breaking News

दिल्लीतील कामगिरीमुळे आपचा पंजाबमध्ये विजय, काॅग्रेसला झटका - शरद पवार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांपासूनच आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्ता स्थापनेच्या जवळ पोचला आहे. आपने सुमारे 90 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. या निकालावर बोलताना राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हणले आहे की, दिल्लीतील कामगिरीमुळे आपचा पंजाबमध्ये विजय मिळाला आहे. दिल्लीत आपने दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबमध्ये आपला स्वीकारले गेले. पंजाब वगळता इतर राज्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांना कौल मिळाला आहे. पण पंजाबच्या शेतक-यांत केंद्र सरकारविषयी राग होता. पंजाब मधला बदल भाजपला अनुकूल नाही. तसेच तो काँग्रेसला झटका देणारा आहे. काँग्रेसची स्थिती पंजबामध्ये चांगली होती. मात्र जे बदल झाले ते जनतेने नाकारले. अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणे काँग्रेसची चूक होती. दिल्लीत जे आंदोलन झाले त्यात पंजाबचा फार मोठा सहभाग होता. म्हणून लोकांनी भाजप काँग्रेसला नाकारत 'आप'ला सत्ता दिली.

No comments