web-ads-yml-728x90

Breaking News

टेक्नोक्राफ्ट कंपनीला 50 वर्ष पुर्ण...

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड ,ठाणे

सर्वत्र टेक्नोक्राफ्ट कंपनी ही अगे्रसर असून या कंपनीला 50 वर्षे पुर्ण झाले आहे.या कंपनीच्या माध्यमातून विविध असे प्रोडक्ट वस्तु चिज बनविले जात असून अनेक बेरोजगारांना रोजगार देऊन त्यांच्या कुटूंबाला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.अशी टेक्नोक्राफ्ट कंपनी मुरबाडमध्ये असून अनेक ठिकाणी या कंपनी चांगल्या उत्तुंग घेतलेल्या भरारीने आज मुरबाडमध्ये एकून 5 कंपनीच्या माध्यमातून पाच हजार इतके कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.याच कामगाराची संख्या पाहता कुटूंबाची संख्या पाहिली तर एका कामगाराबरोबर त्यांचे किमान कौटूंबिक एक सदस्य पकडले तर दहा हजार इतके लोकांचे उदनिर्वाह होत असल्याचे म्हणता येईल.कोरोना कालावधीत ही कोरोना नियमांचे पालन करून कामगारांना पगार हा चालू होता त्यामुळे टेक्नोक्राफ्ट कंपनीने माणूसकी वृत्ती सुध्दा जपली आहे.मुरबाडमध्ये टेक्नोक्राफ्ट कंपनीतून अनेकांना रोजगार प्राप्त झाले असून तुषारशेठ कडवाडकर यांच्या माध्यमातून अनेक कंपनी स्थापण करून प्रथम स्थान मुरबाडकरांना दिले आहे.आज याच टेक्नोक्राफ्ट कंपनीला 50 वर्षे पुर्ण झाल्याने एक आनंदाचे वातारवरण कामगार वर्गात निर्माण झाले आहे.या कंपनीने ड्रम क्लोजर जगामध्ये दुसरा क्रमांक पटकावला असून यर्न स्कॅफोल्डींग आणि इंजिनियरींग या कंपनीत काम करित आहेत.श्री.तुषारशेठ कडवाडकर यांनी अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध या टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या माध्यमातून करून दिल्याने त्यांना मराठी उद्दयोजक म्हणून गौरविण्यात आले होते इतकेच नव्हे तर कोरोना कालावधीत अनेक कामगारांच्या घराची चूल पेटवून देण्यात त्यांच योगदान अमुल्य ठरले आहे.त्यांचे योगदान आणि मार्गदर्शक हे गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामगारांना मिळत असून विविध प्रकारचे मदतीला त्यांचा पुढाकार हा कायमच राहिला आहे त्यामुळे टेक्नोक्राफ्ट कंपनीला पुढिल वाटचालीस त्यांनीही प्रामुख्याने शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments