web-ads-yml-728x90

Breaking News

नवाब मलिक यांच्या ईडीविरोधातील कारवाईवरील याचिकेवर 15 मार्चला फैसला

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

कुख्यांत गुंड दाऊत इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार तसेच त्यांच्या बहिणीशी जमीन व्यवहार प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग ( Bombay High Court on Nawab Malik ) झाल्याच्या आरोपात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. या विरोधात नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर चार दिवस युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला असून 15 मार्च रोजी देणार आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 23 फेब्रुवारी रोजी अटकेची कारवाई केली होती. ही अटक बेकायदेशीर असून मला यात राजकीय षडयंत्रामुळे अडकवण्यात आला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी आपल्या याचिकेत केला होता. नवाब मलिक यांच्या म्हणण्यानुसार ईडीकडून करण्यात आलेली कारवाई या प्रकरणात करण्यात आली आहे. ते प्रकरण 20 वर्षापूर्वीचे आहे. पीएमएलए कायदा हा 2005 मध्ये अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळे त्या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याने हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती.

No comments