web-ads-yml-728x90

Breaking News

दाऊदसह डी-कंपनीविरोधात गुन्हा दाखल; NIA ची कारवाई

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवनवी दिल्ली

राष्ट्रीय तपास संस्थेने ( National Investigation Agency ) सोमवार अंडरवर्ल्ड डान दाऊद इब्राहिम ( Dwaood Ibrahim ) आणि अन्य साथीदारांविरोधी बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायदा ( Unlawful Activities Prevention Act ) यासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेनेच्या कर्मचाऱ्यांना दाऊद विरोधात तपास करण्याची संमती दिली आहे. एनआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय तपास संस्थेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांची नावे नमूद केली आहेत. अहवालानुसार दाऊद इब्राहिम दीर्घकाळापासून देशात दहशतवादी कारवाया वाढवण्याचे काम करत होता. तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी देशात अशांतता निर्माण करणाऱ्या घटकांना हवाला माध्यमातून आर्थिक मदत केली. केंद्रीय एजन्सी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी-कंपनीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहेत.

No comments