web-ads-yml-728x90

Breaking News

ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांच्या वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती – वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची माहिती

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

वीज सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांची वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती देण्यात आली आहे.  यंत्रमागधारकांची थांबविण्यात आलेली वीजसवलत पूर्ववत करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली.वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी रविवारी, इचलकरंजी येथील संवाद सभेत यंत्रमागधारकांची वीजबिल सवलत पूर्ववत ठेवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत आज वस्त्रोद्योग आयुक्तांना वीज बिल सवलत पूर्ववत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज प्रणाली सुलभ करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्याबरोबरच यंत्रमागधारकांकडून सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

No comments