web-ads-yml-728x90

Breaking News

७ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक.. न्यायालयाकडून ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी..

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, मनी लाँड्रींग प्रकरणात जुन्या मालमत्तांच्या व्यवहारांप्रकरणी मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू होती. सकाळी 7 वाजल्यापासून त्यांची चौकशी झाली पहाटेच ईडीचे पथक मलिकांच्या घरी धडकले होते. मलिकांनी यापूर्वी अनेकदा ईडीचे अधिकारी आपल्या घरी छापा टाकणार असल्याचे म्हटले होते. कोणत्याही कारवाईचा सुगावा लागल्यानंतर ते जाहीरपणे त्याची उघडणी करतात. परंतु आज अचानकपणे ईडीच्या कार्यालयात नवाब मलिक दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दुपारी 3 नंतर ते बाहेर आले त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे त्याच वेळी त्यांना ईडीने अटक केल्याचे स्पष्ट झाले. मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची चर्चा सुरु होतीच. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे.

No comments