लता मंगेशकर दुखवटा, राज्यातील केंद्रिय बँकाही राहणार बंद
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन ( Lata Mangeshkar Passes Away ) झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज बंद ठेवले जातील. मात्र, केंद्र सरकारच्या अख्यत्यारीतील बँका सुरु राहतील का नाही, यासंदर्भात अनेकांना संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकार अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ( Reserve Bank Of India ) अखत्यारित एसबीआय, बँक ऑफ इंडिया या सरकारी आणि इतर खासगी बँका येतात. म्हणून त्यांच्यावर राज्य सरकारचे निर्णय लागू होत नाही. केंद्र सरकारनेही तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. मात्र, सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. त्यामुळे आता आरबीआयने याबाबत माहिती दिली आहे.
No comments