web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडच्या खापरी गावातील शेतकरी घराण्यातील सुपुत्र विनायक नामदेव गोल्हे यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती प्राप्त

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव  मुरबाड,ठाणे

‘‘ घाम गाळून मेहनत घेत कुटूंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या शेतकर्‍याचा सुपुत्र मोठया पराकष्टाने गरिबीची जान राखत जन्म घेतलेल्या मायभुमीतून जिद्दीने व निष्ठेने यशस्वी शिखर गाठतो तेव्हा खरंच त्याचे मोल अमुल्य ठरते ’’ अशाच यशस्वी शिखराचे कौशल्य गाठतांना आम्ही आमच्या डोळयासमोर पाहिले आहे.नेहमी हसरा चेहरा आणि कर्तव्यदक्षाची भूमिका साकारून समाजातील प्रत्येक व्यक्तींचा आदरपूर्वक सन्मान करून न्यायाची बाजू समजावून अन्यायाविरोधात कणखर पणे अन्यायग्रस्त लोकांच्या पाठिशी राहून समाजातील प्रत्येक घटकांतील लोकांना,नवयुवक युवतींना प्रोत्साहन देण्याची निस्वार्थी भूमिका पार पाडतांना मुरबाड तालुक्यातील खापरे गावातील भूमिपुत्र श्री.विनायक नामदेव गोल्हे यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदोन्नती प्राप्त झाली. 

 शेतकरी कुटूंबात जन्म झालेल्या गोल्हे परिवारात मोठया पराकष्टात आई वडिल हे अल्पशिक्षीत होते परंतु परिवाराचा सांभाळ करताना त्यांच्या शिक्षणात कोणतीही कमी पडू दिली नाही.अशा मुरबड तालुक्याच्या खापरी गावात श्री.विनायक नामदेव गोल्हे यांचा 01/06/1975 साली जन्म झाला.10 वी पर्यंत शारदा विद्दयालय,टोकावडे येथुन शिक्षण घेत पुढिल 12 वी पर्यंत पद्मश्री अण्णासाहेब जाधव ज्युनिअर कॉलेज भिवंडी येथे शिक्षण पुर्ण केले.पुढे अर्थशास्त्र विषयात अग्रवाल कॉलेज कल्याण येथुन पदवी प्राप्त केली तर पुर्ण विद्दयापीठात एम.ए अर्थशास्त्रामध्ये शिक्षण पुर्ण केले.यामध्ये प्रामुख्याने वैशिष्टय सांगायचे झाले तर पहिल्यापासूनच अतिशय बुध्दीवान,पराकष्टाची झळ आणि मनाचे साधेपणा त्यांना कधी पहिल्या क्रमांकाचे स्थान सोडण्यास मागे हटू दिले नाही कारण घरची परिस्थिती ही हालाकीची आणि गरिब असल्याने केवळ जिद्द,चिकाटी,नियोजनाची आखणी म्हणून कधीच प्रथम क्रमांक सोडले नाही आणि अखेर यशाचे गरूडशिखरावर पोहोचण्याची शिडी त्यांना त्यांच्या नशिबानी दाखवली त्यातच त्यांची महत्वकांक्षा दिसली ती म्हणजे एम.पी.एस.सी....

सन 2006 साली अखेर एम.पी.एस.सी ची परिक्षा देत उत्तीर्ण झाले आणि पोलिस उपनिरीक्षक पदी त्यांची निवड झाली.पुढे त्यांच्या कार्याला व निर्भिडतेला पाहून सन 2014 साली त्यांची सहाय्यक पोलिस निरिक्षक पदी पदोन्नती झाली.या कालावधीत त्यांनी एल.एल.बी करून एल.एल.एम म्हणून शिक्षण चालु ठेवले आहेत.त्यांनी सन 2006 ते सन 2021 सालापर्यंत मुंबई शहर,सी.बी.आय आर्थिक गुन्हे शाखा पुणे ,राज्य गुप्तचर विभाग,तर सी.आय.डी म्हणून काम केले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून दीपस्तंभ नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून मुरबाड,शहापूर,कल्याण,कर्जत इत्यादी तालुक्यातील होतकरू मुला मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास मार्गदर्शन व प्रेरणा देण्याचे कार्य करून पोलीस भरती,सैन्य भरती बँक,पोस्ट भरती,एम.पी.एस.सी,स्टाफ सिलेक्शन स्पर्धा परीक्षेतून ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी यांना यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व मार्गदर्शन करित आहेत.

No comments