web-ads-yml-728x90

Breaking News

गुन्हेगारांचे कर्दनकाळ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे;मुरबाड पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कामगीरीचे मुरबाड तालुक्यात कौतुक

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव  मुरबाड,ठाणे

दुकाने फोडून रोख रक्कम व ऐवज चोरून लंपास करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीतील एकाला मुरबाड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली असून ठाणे जिल्ह्यासह रायगड जिल्हातील चोऱ्यांची मोठी उकल होण्याची शक्यता निर्माण झाली असून अवघ्या २ महिन्यांत चोरट्याचा शोध घेणाऱ्या मुरबाड पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कामगीरीचे मुरबाड तालुक्यात कौतुक होत आहे११ डिसेंबर २०२१ रोजी मुरबाड तालुक्यातील म्हसा बाजारपेठे मधील कपड्याची, मोबाईलची, मेडिकलची सुमारे ६ दुकाने फोडून रोख रक्कमेसह ऐवज लंपास केला होता. चोरट्यांनी मागे कोणताही पुरावा ठेवला नव्हता.मात्र मुरबाड पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व चोरीची पद्धत अशी अनेक प्रकारच्या माहितीचे अवलोकन करून आंतर जिल्हा ठाणे रायगड जिल्ह्यात चोऱ्या करणाऱ्या एकास कोणताही धागा दोरा नसताना मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

No comments