web-ads-yml-728x90

Breaking News

दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा महापारेषणमुळे तासाभरात पूर्ववत

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

तांत्रिक बिघाडामुळे रविवारी (दि.२७) दक्षिण मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा महापारेषणच्या प्रयत्नांमुळे तात्काळ पूर्ववत करण्यात आला. दुरुस्तीची कामे अवघ्या पाऊण ते एक तासात पूर्ण करण्यात आली. मेट्रो रेल्वेच्या कामामुळे काही वीजवाहिन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचदरम्यान पर्यायी वीज वाहिन्यांत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.ट्रॉम्बे येथील मुख्य ग्रहण केंद्रामधून दक्षिण मुंबईत वीजपुरवठा करण्यात येतो. कळवा–ट्रॉम्बे, मुलुंड–ट्रॉम्बे, सोनखर–ट्रॉम्बे, चेंबूर–ट्रॉम्बे, सॉल्सेट–ट्रॉम्बे १, सॉल्सेट–ट्रॉम्बे २, चेंबूर–ट्रॉम्बे १ आणि चेंबूर–ट्रॉम्बे २ या वाहिन्यांच्या माध्यमातून दक्षिण मुंबईत वीज पुरविण्यात येते.मुंबई व उपनगरात मेट्रो-२ प्रकल्पाची कामे सुरू आहेत. एमएमआरडीए मेट्रो-२ बी या प्रकल्पाच्या कामासाठी २२० के.व्ही. क्षमतेच्या सोनखर – ट्रॉम्बे आणि चेंबूर–ट्रॉम्बे या वाहिन्या चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारीपासून बंद करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर मेट्रो-४ या प्रकल्पासाठी २२० के.व्ही. क्षमतेची सॉल्सेट – ट्रॉम्बे १ ही वीजवाहिनी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११पासून बंद करण्यात आली होती.

No comments