web-ads-yml-728x90

Breaking News

शिवराष्ट्र सेनेचे उप अभियंता कार्यालयसमोर आमरण उपोषण

 


BY - अफसर शेख ,युवा महाराष्ट्र लाइव - अहमदनगर

शिवराष्ट्र सेनेचे उप अभियंता कार्यालय अहमदनगर क्रमांक 61 रस्त्याच्या दुरुस्ती झालेला गलथान कारभारामुळे प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आज आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून प्रशासनाने अद्याप कुठलीही दखल घेतली नसून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमत करून रस्त्याच्या कामाची क्वालिटी कंट्रोल गुणवत्ता नुसार मटरेल न वापरता अतिशय निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून साहित्य वापरल्यामुळे रस्ता पूर्णपणे खराब झालेला असून रस्त्याच्या मधोमध ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून याची सर्व जबाबदारी कार्यकारी अभियंता कार्यालय अहमदनगर तसेच संबंधित ठेकेदार असताना कार्यालयातील अधिकारी यांनी जबाबदारी कर्तव्य न करता नागरिकांनी जो पैसा कर स्वरूपात भरलेला आहे याची अफरातफर करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम हे करत आहेत जनतेची राजरोसपणे डोळ्यात धूळफेक होत आहे शिवसेनेच्या वतीने या दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्याविरुद्ध चौकशी करून संबंधित दोषी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करावेत हे संबंधित ठेकेदार याची सखोल चौकशी करून एजन्सीला काळ्या यादीत समाविष्ट करावी व हा रस्ता सदरचा रस्ता पुन्हा त्याच ठेकेदाराकडून ऐकून घेण्याचे आदेश व्हावेत यासाठी उपोषणाचा चौथा दिवस असून अद्याप प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही यांच्याकडे कुठली कागदपत्रे सध्या उपलब्ध नसून टाळाटाळ करत आहेत ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करत आहे हे सर्व राजकीय दबावाखाली चाललेला असून याचा पोलखोल केल्याशिवाय शिवराष्ट्र सेनेचे आमचे आंदोलन मागे घेणार नाही प्रशासन अधिकारी तसेच राजकीय पुढारी यांच्या कुठलीही दादागीरी दबावाला बळी न पडता त्याचा पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही शिवराष्ट्र सेना जय हिंद जय महाराष्ट्र . संतोष नवसुपे शिवराष्ट्र  सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष . सुभाष अल्लड राष्ट्र सेनेेचे जिल्हा सचिव. संदीप ठोंबे सामाजिक कार्यकर्ते अक्षय ठोंबे सामाजिक कार्यकर्ते . हे सर्व उपस्थित होते

No comments