web-ads-yml-728x90

Breaking News

कामगार विमाच्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी होण्यासाठी पत्रकार कुणाल शेलार करणार पत्रव्यवहार

 


BY - संतोष चाळके ,युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

मुरबाड तालुक्यातील अनेक कंपन्यांमध्ये कामगारांची नोंद ही कामगार विमा योजनेत झाली असून याच कामगार योजनेत सात ते साडेसात कोटी चा घोळ झाल्याची चर्चा रंगली होती त्यासंदर्भात संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून नेमकी हा घोळ कोणी ? कोणाच्या माध्यमातून ? कोणाच्या संगनमताने व कोणत्या डॉक्टरांनी कोणाच्या हॉस्पिटलमध्ये कधी ? कुठे ? केव्हा केला याविषयी माहिती मागितली आहे.सदरहू कामगार विमा अंतर्गत प्राथमिक स्वरूपात प्रायमरी व सेकंडरी अशी दोन हॉस्पिटल कळून येत असून नेमकी कोणाच्या पारड्यात सात-साडेसात आकडा गेला हे लवकरच सर्वांचे समोर आम्ही आणून देणार आहोत.गल्लीतून चौकावरील चर्चेला उधान आले असता ही चर्चा सत्य असल्याचे सूत्रांकडून कळत आहे.परंतु त्यांनी सांगितले की आम्ही असे भ्रष्टाचार केले नाही मग चर्चा विनाकारण का रंगू लागली आणि सूत्रांची माहिती ते डॉक्टर कोणाच्या संगनमताने खोटे ठरवू लागली याचे बोध होणे आत्ताच्या घडीला कठीण झाले आहे. 

        एकीकडे बोगस डॉक्टरांची शोध मोहीम सुरु आणि त्यात विनापरवानगी हॉस्पिटल, क्लिनिक यांची ही माहिती मागविण्यात आली आहे त्यापैकी ६२ हॉस्पिटल रुग्णालय,क्लिनिक असून किती रुग्णालय हॉस्पिटल क्लिनिक ची नोंद आहे आणि किती काळया यादीत हे लवकरच निदर्शनास येणार असून तमाम जनतेला यासंदर्भात आम्ही माहिती सांगून जनजागृती करत टाळू वरील लोणी खाणाऱ्यांचे चेहरे समोर आणणार आहोत.

                 त्यातच कोणाची किती खाटा ? कुठे उपचार ? कोण डॉक्टर आणि कामगार विमांचे विमा कामगारांसह त्यांचे कुटुंबाचे उतरवून घेण्यात आलेले विमा, त्यातून काढण्यात आलेले भरमसाठ बिल,बनवलेले खोटे अहवाल खरे आहेत की खोटे करून खरे दाखवले याबाबतची चौकशी आज रोजी पर्यंत गुलदस्त्यात ठेवून नेमकी खरेखोटे डॉक्टरांनी काय आणि किती आकड्यांचा घोळ केला याची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी म्हणून पत्रकार कुणाल शेलार हे येत्या २ दिवसांत राज्य शासनाकडे व केंद्राकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगण्यात आले असून संबंधित संगनमत करणारा अधिकारी,डॉक्टर,कंपनी मालक व अन्य यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची विनंती या पत्रकातून करण्यात येणार आहे. 

            कामगार विमात खोटे एक्स-रे,खोटे बील,अॉडीट रिपोर्ट,भरमसाठ बिल दाखवून सात ते साडे सात कोटी रुपये इतका मोठा भ्रष्टाचार डॉक्टर कोणाच्या जोडीने करू लागला त्याची चौकशी ही झालीच पाहिजे याकरिता राज्य मंत्री सह,केंद्रीय विभाग अधिकारी यांनाही पत्रव्यवहार करण्यात येणार असून मुरबाड येथील प्रायमरी सेकंडरी कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार करण्यात आलेल्या रुग्णांची घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा करुन त्या डॉक्टरांवर कारवाई करून त्यांचे कामगार विमा ठेका काढून घेऊन त्यांचे हॉस्पिटलला काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी सुद्धा करण्यात येणार आहे.पत्राची तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती कायम असून दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात येणार आहे.

 

No comments