web-ads-yml-728x90

Breaking News

‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ विषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा १५ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइवठाणे

भारत निवडणूक आयोगाने ‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ याविषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. प्रश्नमंजूषा, घोषवाक्य, गीत तयार करणे, व्हिडीओ, आणि पोस्टर डिझाईन अशा पाच प्रकारच्या स्पर्धांचा समावेश असून १५ मार्च २०२२ पर्यंत प्रवेशिका स्विकारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी यास्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत स्पर्धा आयोजित करून आयोग जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकटीकरण्यासाठी करण्यात येत आहे. ‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीयस्तरावरील ही स्पर्धा असून प्रश्नमंजूषा स्पर्धेद्वारे निवडणूकीबाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी. प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.in येथे ईमेल कराव्यात. ईमेल करतांना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका १५ मार्च २०२२ पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलांसह voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठविण्यात याव्या, असे आयोगाच्यावतीने कळविण्यात आले आहे.या स्पर्धेत प्रश्नमंजूषा स्पर्धा, घोषवाक्य (Slogan) तयार करण्याची स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा आणि पोस्टरची डिझाईन करण्याची स्पर्धा यांचा समावेश आहे.

No comments