शेलारमामांच्या पुण्यतीथी दिवसानिमित्ताने माघ शुध्द दशमीला पुजा
BY - नितेश शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – कुडपण
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सरनौबत शेलारमामा तथ कोंडाजी रायाजी शेलार मामा यांचा इतिहास संपूर्ण हिंदुस्थानामध्ये प्रसिध्द आहे.शेलार मामांचे जन्म गाव कुडपण आहे.माघ शुध्द दशमी हा दिवस सरनौबत शेलार मामांच्या पुण्यतीथीचा दिवस आहे.1671 माघ शुध्द दशमीला शेलार मामा आपल्या मधुन निघुन गेले त्याला 351 वर्षे पूर्ण झाली आहेत.शेलारमामांची समाधी आज हि कुडपण खुर्द येथे आहे.प्रतिवर्षीप्रमाणे त्यांच्या पुण्यतीथी दिवसानिमित्ताने माघ शुध्द दशमीला पुजा करताना शिवथर घळ व सुंदर मठाचे प्रमुख संशोधक श्रीगुरूदेव अरविंदनाथजी महाराज आणि शेलारमामांचे वंशज तसेच कुडपण ग्रामस्थ उपस्थित आहेत.
No comments