web-ads-yml-728x90

Breaking News

पुरालेखागारांचे कार्य व महत्व ' या विषयावर ऑनलाईन व्याख्यान

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव  मुरबाड,ठाणे

जनसेवा शिक्षण मंडळ, मुरबाड संचलित शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय, शिवळे येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त ' इतिहास मंडळा ' च्या वतीने दि.8/02/22 रोजी ,महाराष्ट्रातील पुरालेखागारांचे कार्य व महत्व ' या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते. प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्याचे पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शन पर भाषणात त्यांनी भारतीय पुराभिलेखागाराचीस्थापना, रचना व व्यवस्थापन याची माहिती दिली तसे पुराभिलेखागाराची भूमिका ही ऐतिहासिक कागदपत्रांचे जतन करण्याची आहे, या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होऊ शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. गीता विशे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. गुरुनाथ घुटे यांनी केले. तांत्रिक सहकार्य प्रा. हेमांगी राणे व श्री मयूर आवार यांनी केले.या व्याख्यानात जे. पी. महाविद्यालय, टोकावडे, एस. बी. महाविद्यालय, शहापूर व गोवेली महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभागी झाले होते.

No comments