web-ads-yml-728x90

Breaking News

अन्याय अत्याचार निर्मुलन समितीने रणतळे येथे साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज यांचा "शिवजन्मोत्सव सोहळा"

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव नाशिक

रणतळे वनारवाडी ता.दिंडोरी या ठिकाणी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज "शिवजन्मोत्सव सोहळा" अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे समितीचे प्रदेशाध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे अध्यक्षतेखाली तर मा.पोलीस उपअधीक्षक अनंतराव पठाडे यांचे उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. या वेळी विचारपिठावर सुप्रसिद्ध व्याख्यात्या मिनाक्षीताई जगदाळे, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वसंतराव वाघ,अअनिस प्रदेश-सरचिटणीस अण्णासाहेब पंडीत, वैशालीताई जाधव, रफीक सैयद, अशोकभाऊ गांगुर्डे, वैशाली चव्हाण, टीकुभाई कोहली, मुकेश सोनवणे, मनिषा पवार, राधा क्षिरसागर, माया आहीरे, वर्षा आहीरे, इत्यादी पदाधिका-यांसह जेष्ठ समाजसेविका उज्वला महेंद्र पंडीत (मुंबई) सचिन गाडे आदी.मान्यवर उपस्थित होते. 

शिवजन्मोत्सव कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस मान्यवरांचे हष्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमान्तर्गत कवी राजु लहीरे सर व परवीन बागवान यांचे गितगायन झाले तसेच अअनि समितीचे रफीक सैयद व विशाल पांडव यांनी अंधश्रद्धा व बुवाबाजी वर आधारित प्रबोधनात्मक लघुनाटीका सादर केली. राधा क्षिरसागर व सुनिता वाघ यांनी राजमाता जिजाऊ भोसले यांची वेषभुषा तर रफीक सैयद यांनी तानाजी मालुसरे यांचे पात्र घेवून कलाविष्कार सादर केला. समितीच्या बालकलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषण देवुन वकृत्व कलेत आपणही मागे नाही याची झलक दाखवली. व्याख्याता मिनाक्षी जगदाळे यांनी शिवचारित्र्यासह महीलांच्या सामाजिक सहभागा विषयी माहिती देवुन उपस्थितीत शिवप्रेमींचे प्रबोधन केले. यापुढे आपण रविंद्रदादा जाधव यांचे नेतृत्वाखाली संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणार आहे असल्याचे मिनाक्षी जगदाळे यांनी जाहीर केले. समाजसेवक सचिन गाडे (कल्याण) आणि जेष्ठ समाजसेविका तथा कॉंग्रेसच्या पदाधिकारी मा. उज्वलाताई महेंद्र पंडीत यांनी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे सदसत्व स्विकारल्याची घोषणा समितीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांनी केली तसेच सचिन गाडे यांना कल्याण तालूकाध्यक्ष पदाची जबाबदारी देवुन उज्वला पंडीत यांनाही संघटनेची मोठी जबाबदारी पुढील महिन्यात मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात देण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले. या प्रसंगी शशीभाऊ जाधव , राजाभाऊ सोनवणे, रेखाताई जाधव, प्रविण पांडव, प्रविण जाधव, मुक्तारभाई शेख, प्रकाश कुमावत, ममता पुणेकर, शारदाताई जाधव, सुवर्णाताई गांगुर्डे, भिमराव जाधव, संदीप गांगुर्डे, चंद्रकला जाधव,निर्मला गायकवाड,शोभा वाहुळे, रविराज सोनवणे, सचिन बागुल, विकी पगारे, संदीप साबळे, सुनिता ताई जाधव, मंगल पगारे, बेबी आहीरे, क्रांती मोरे, कोमल जाधव, ताईबाई पवार, संदीप ढेंगळे, सुदेश गांगुर्डे, अॅड.शेखर पगारे, बाळासाहेब क्षिरसागर, मिलिंद जाधव, राजेंद्र जाधव, पल्लवी पगारे, संगीता जाधव, आदींसह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. संपुर्ण कार्यक्रमाचे सुनियोजित सुत्रसंचालन प्रदीपनाना गांगुर्डे यांनी केले तर संदिप साबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा समारोप वनभोजनाचा आस्वाद घेऊन करण्यात आला.

No comments