web-ads-yml-728x90

Breaking News

उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून संपूर्ण कोकण विभागातून ठाणे जिल्हाधिकारी श्री राजेशजी नार्वेकर यांची निवड

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड ,ठाणे

अतिशय शांत स्वभाव परंतु परखड भूमिका,गोरगरिबांसाठी नेहमी सतत सेवा देत अनेक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देऊन भ्रष्टाचाराचा नाहीनाट करून नेहमी आदर सन्मानाने सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत त्यांच्या पातळीवरील समस्या जाणून घेत प्रशासकीय भूमिकेतून प्राप्त झालेल्या समस्यावर जातीने लक्ष केंद्रित करणारे धडाडी,निस्वार्थी,ठाणे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री.राजेशजी नार्वेकर यांनी आपल्या कार्यशैलीने जिल्ह्याच्या विकासाचे कायापालट करून दाखविले आहे.ग्रामीण भागाचा विकास कधी श्री.नार्वेकर यांचे कालावधी थांबला नाही, झपाट्याने विकास होत गेला. त्यांच्या संयमी आणि निस्वार्थपणाची भूमिका ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी मान्य केली आहे.आजही नागरिकांच्या विविध भेडसावत असणाऱ्या समस्या जाणून घेत असून शासनाच्या विविध योजना तळागळात नेऊन प्रत्येक नागरिकांना विविध विभागातून जनजागृतीच्या माध्यमातून लाभ मिळवून दिले आहे.नागरिकांच्या समस्या व त्यांच्या प्रश्नावर प्रथम लक्ष केंद्रित केले आहे." त्यांच्या कामाची गती ही हवे सारखे आहे, तुफान जरी असली तरी ती दिसत नाही " आणि मुख्य वैशिष्ट ठाणे जिल्हाधिकारी श्री राजेशजी नार्वेकर यांची आहे की बारकाईने लक्ष आणि कडक शिस्त जी आजही जिल्ह्याला महाराष्ट्राच्या नकाशावर विकास शैलीचे त्यांचे मुख्य कारण ठरले आहे.न्यायाच्या बाबतीत सक्षम प्राधिकरणात त्यांची प्रगत वाटचाल नायक म्हणून ठरली आहे.

       ठाणे जिल्ह्याचे अग्रेसर पथाला महत्त्वपूर्ण योगदान ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे मिळाले असून ते अमुल्य ठरले आहे.त्यांनी माणुसकी जरी जपत नैतिकता जोपासली आहे. कोरोना कालावधीतही त्यांनी जी दक्षता प्रत्येक नागरिकांसाठी घेतली त्यामुळे विविध शासनाची निर्बंधाचे पालन करण्याच्या सूचना तमाम जनतेला देत ठाणे जिल्ह्याच्या कोरोनाला आटोक्यात आणण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे.ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे हाहाःकार असताना श्री.नार्वेकर साहेबांनी वेळीच यंत्रणा सज्ज केली.खबरदारी व जबाबदारी यातून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करीत लसीकरण करून घेण्याचे वेळोवेळी जनजागृती केली आहे. असे विकासाचे पाया रोवणारे ठाणे जिल्हाधिकारी श्री.राजेशजी नार्वेकर यांनी सन २०२१- २२ या काळात झालेल्या निवडणुकीत उत्कृष्टपणे कामगिरी केली. त्यांच्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली असता त्यांच्या उत्तम आणि कणखर प्रशासकीय कार्यातून मतदार जनजागृती अतिशय धडाडी आणि चांगल्या पद्धतीने पार पाडली.

       त्यांच्या याच कार्याची दखल शासनाने घेतली आणि आज संपुर्ण कोकण विभागातून त्यांची उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.त्यांच्या कार्याची प्रशंसा जितकी करावी तेवढी कमीच आहे.परंतु एका विषयाबाबत अभिमान आहे की असे ठाणे जिल्हाधिकारी म्हणून कोकणाच्या वसेत आम्हांस लाभले. त्याबद्दल आम्ही आमच्या YML NEWSस्वतंत्र संपादक पत्रकार संघाकडुन त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस मुरबाड तालुक्याच्या प्रत्येक नागरिकांकडून शुभेच्छा देत आहोत.

No comments