web-ads-yml-728x90

Breaking News

‘मावज’च्या सोशल मीडिया मोहीमेमुळे महाराष्ट्राच्या चित्ररथास ‘लोकपसंती’ – माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आक्रमक सोशल मीडिया मोहीमेमुळे जनादेश जिंकण्यात मोलाची मदत झाल्याचे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी काढले आहेत.जैवविविधतेच्या बाबतीत महाराष्ट्र हे अत्यंत समृद्ध राज्य असून सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत साकारण्यात आलेल्या या चित्ररथाव्दारे महाराष्ट्रातील जैव विविधतेतील समृद्धता  दिसून आली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयानेही ऑनलाईन ओपिनियन पोल आक्रमकपणे पुढे नेण्यात मोलाचे योगदान दिले. एकत्रित आणि आक्रमक सोशल मीडिया मोहीम राबविल्यामुळे राज्याला लोकपसंती वर्गवारीत जनादेश जिंकण्यात मोठी मदत झाली, असे गौरवोद्गार काढत माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

No comments