web-ads-yml-728x90

Breaking News

संत झेवियर्स महाविद्यालयाच्या,मराठी वाङ्मय मंडळाचा उत्सव "आमोद'२२" येतोय लवकरच..

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

यंदा ९९ व्या वर्षात पदार्पण केलेले संत झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ हे मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील सर्वात जुने सांस्कृतिक मंडळ आहे. या महाविद्यालयात वर्षभर अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. यातीलच प्रमुख असलेल्या आमोद'२२ हा वार्षिक आंतरमहाविद्यालयीन उत्सव "अखंड परंपरा, अतूट वारसा" या संकल्पनेसह दि. ३ ते ५ मार्च च्या दरम्यान रंगणार आहे. यंदाचे आमोदचे सलग ९ वे वर्ष आहे. 

शैक्षणिक वर्ष २१-२२ मधील सर्व कार्यक्रमांचे मंडळाने ऑनलाईन माध्यमांद्वारे आयोजन केले होते. यानुसार आमोद ही ऑनलाईन स्वरूपातच असेल. आमोद म्हणजे निव्वळ आनंद, जो पसरवण्याचा म. वा. मं. चा नेहमीच प्रयत्न असतो.कला, नाट्य, संगीत, नृत्य, साहित्य अश्या सर्व विभागातील स्पर्धांनी यंदाचा आमोद बहुरंगी नटला आहे. तब्बल एकूण १८ निरनिराळया स्पर्धांचे आयोजन या ३ दिवसीय उत्सवात केले आहे. दि. १३ फेब्रुवारी रोजी "ताल - जागर लोककलेचा" या उद्घाटन पूर्व समारंभाचे आयोजन केले होते. भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर जी यांना सुरेल आदरांजली या Musical concert च्या माध्यमातून वाहण्यात आली. याप्रसंगी सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक समीर सप्तिस्कर व मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी चे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर विख्यात लोककलावंत कृष्णाई उळेकर यांची विशेष परफॉर्मर म्हणून उपस्थिती होती.आपल्या मराठी संस्कृतीची मूळं म्हणजे आपले लोक कलाकार. शब्दशः बघायला गेलं तर, "लोककला म्हणजे लोकांनी आपल्या लोकांसाठी मांडलेली कला". लोककला आपल्याला मातीतल्या संस्कृतीचं व परंपरेचं दर्शन घडवते. त्याचशिवाय मनोरंजन आणी समाजप्रबोधन सुद्धा करते. पोवाडा, अभंग, लावणी, कोळीगीत या कार्यक्रमात सादर झाली. यासोबतच कृष्णाई ने स्वलिखित गोंधळ सादर केला. प्रणव काफरे आणि मेखला रानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आमोद'२२ च्या करंडकावर नाव कोरण्यासाठी महाविद्यालयांची कडवी चुरस असून, यंदाचे विजेतेपद कोण पटकावेल हे पाहण्याजोगे असणार आहे. आमोद'२२ च्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी खाली दिलेला QR code स्कॅन करा. २२ फेब्रुवारी ला नोंदणी बंद होतील. फॉक्सटेल आमोद चे प्रमुख प्रायोजक आहेत. आमोद '२२ बद्दल अधिक महिती घेण्यासाठी mvm.xaviers या फेसबुक व इंस्टाग्राम वरील पेज ला नक्की भेट द्या.

No comments