web-ads-yml-728x90

Breaking News

बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक धारूर किल्ल्यातील तोफगोळ्यांची चोरी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव बीड

“महादुर्ग” म्हणून प्राचीनतेची साक्ष देणारा किल्ला हा आपल्या बीड जिल्ह्याला लाभला आहे. किल्ल्यावरील दुर्गअवशेष पडक्या स्थितीत आहेत. किल्यावर फारसी व देवनागिरी मधील शिलालेख व मूर्तीशिल्प आहेत. विहिरी हमामखाना सैनिक खोल्या टांकसाळ बुरुज अश्या विविध वास्तू किल्ल्याच्या इतिहासाची साक्ष देत आहेत. सदर किल्ला हा राज्य पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत अ वर्गात संरक्षित स्मारक आहे. किल्ल्याची डागडुजी आणि जतन संवर्धन झाले तर बीड जिल्ह्यातील पर्यटनास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.परंतु काही वर्षा पूर्वी 2016-2017  रोजी पुरातत्व विभागाने गायत्री कंट्रक्शन औरंगाबाद  या कंत्राटदाराला एवढ्या 7 कोटीचा निधी देवून तटबंदी बांधकाम झाले त्यानंतर लगेच  3 वर्षांनी हे बांधकाम पडले परत याच कंत्राटदाराला ते काम देण्यात आले. या कंत्राटदरावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच गेल्या दीड वर्षापासून या किल्ल्याला सुरक्षा रक्षक नाही ३०ते ४० एकर मध्ये पसरलेल्या किल्ल्यावर रक्षक किंवा एकही कामगार नाही. महाराणा प्रताप या कंपनी मार्फत पहारेकरी कंत्राट पद्धतीवर पुरातत्व विभाग ठेवत होते. या कंपनीने पाहरेकरी यांचा सहा सहा महिन्याचा पगार दिलेला नाही. तर कंत्राट हि रीनिव्ह केलेलं नाही.सध्या हा किल्ला किल्ल्यात बांधकाम करत असलेल्या कंत्राटदाराच्या हवाली सोडण्यात आलेला आहे.

सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत दि.22 जुलै 2021  रोजी किल्ल्याची अभ्यास मोहीम झाली. त्यानंतर संस्थेचे सदस्य गणेश रघुवीर यांनी सविस्तर संवर्धनाबाबत अहवाल हा सहय्यक संचालक व संचालक राज्य पुरातत्व विभाग यांना पाठविला होता. अहवालात संवर्धनाबाबत सूचना करण्यात आलेली १५ कामे होती. परंतु त्या अहवालातील कोणतीही कामे किंवा उत्तर पुरातत्व विभागाने अद्याप दिलेला नाही.

अहवालात तोफ गोळे चे छायाचित्र आणि तोफ गोळे संवर्धन व्हावे असे नमूद करण्यात आले होते. याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी संस्थेच्या स्वाछ्ता मोहिमे दरम्यान सदस्यांनी पाहणी केली असता प्रवेशद्वाराकडील देवडीत ठेवलेले १५ तोफगोळे चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पुरातत्व विभागला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच स्थानिकांच्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांपासून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडण्यात आले होते.

पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक श्री. अजित खंदारे व संचालक यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रथम पहारेकरी नेमावा अशी मागणी संस्थेचे बीड जिल्हा प्रमुख अशोक खेत्रे यांनी केली. अन्यथा आंदोलन केले जाईल. ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यांची अश्या प्रकारे भ्रष्टाचार व ऐतिहासिक वास्तू चोरी होणे हि गंभीर बाब आहे.

No comments