web-ads-yml-728x90

Breaking News

आतकोलीमध्ये उत्सव शिवजंतीचा उत्सव माझ्या राजाचा सोहळा उत्साहात संपन्न

 


BY - महेश राऊत,युवा महाराष्ट्र लाइव पडघा, भिवंडी

१९ फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्या जयंती निमित्त पडघा शहराजवळील आतकोली गावात सालाबादप्रमाणे यावर्षीही उत्सव शिवजयंतीचा उत्सव माझ्या राजाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरा झाला. आतकोली गावाचा हा सोहळा भिवंडी तालुक्यातील एक विशेष सोहळा आणि पडघा परिसरातील सर्वात मोठा आणि उत्तम शिवजयंती सोहळा म्हणून ओळखला जातो.

सकाळी १० वा. महाराजांच्या मूर्तीचे पूजन करुन सोहळ्याला सुरवात करण्यात आली यावेळी संपूर्ण  आतकोली गाव हा उपस्थित होता.

त्यानंतर विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ईयत्ता १ ते ८ वी च्या विध्यार्थ्यांनसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रथम ,द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक देण्यात आले. ही स्पर्धा झाल्यांनतर लगेचच महिलांसाठी संगीत खुर्ची आणि बकेट बॉल या खेळांचे आयोजन केले  होते. या खेळांमध्ये गावातील मुली आणि महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून खूप उत्साहात खेळाचा आनंद घेताना दिसून आल्या.

गावातील ८० वर्षाच्या आजीने सुद्धा संगीत खुर्चीमध्ये सहभाग घेऊन सगळ्यांना खेळायची स्फूर्ती आणि एक नवीन ऊर्जा दिली आणि महिलांचा जोश वाढवून प्रत्येक महिलेला आपण सर्व रणारागिनी आहोत हे दाखवून दिल. या स्पर्धेमधील विजेत्यांसाठी तीन आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.

महाराजांची जयंती असल्यामुळे गावातील मुलांसाठी किल्ले स्पर्धा आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा सुद्धा ठेवण्यात आली होती.

आतकोली गाव हा पूर्ण पणे फुलून निघाला होता संपूर्ण गावात एक आनंदमय आणि प्रसन्न वातावरण तयार झाल होत पूर्ण गाव रांगोळी मध्ये सजला होता प्रत्येकाच्या अंगणामध्ये रांगोळी , किल्ला आणि दिवे लावलेले पाहून एक वेगळाच शिवमय वातावरण तयार झाला होता. याच प्रसन्न वातावरणात संध्याकाळी ५ वा. महाराजांचा पालखी सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा साकारून महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा असणारी  ढोल ताशा पथकाची जोड देऊन पूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली.

  रात्री सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते.त्यामध्ये गावातील मुला-मुलींनी चांगल्या प्रकारे सहभाग घेतला होता. रात्री १० वा.महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवव्याख्याते  शिवश्री शिवाजी सातपुते यांचा व्याख्यान झाला असून महाराजांचा लहानपण , महाराजांची कीर्ती, राजेंची शासन पद्धत, स्वराज्य कसे निर्माण केले सध्याची चालू असणारी परिस्थिती आणि पूर्वीची परस्थिती मधील अंतर यांसारख्या विषयावर अतिशय सुंदर अशा शब्दात मार्गदर्शन केल. तसेच त्यांनतर त्यानंतर पैठणी साडीसाठी ज्या महिला बकेट बॉल आणि संगीत खुर्ची यामध्ये प्रथम आल्या होत्या त्यामधून एक लक्की ड्रॉ काढण्यात आला आणि त्यामध्ये सौ.गीता राजेश राऊत यांचं नाव अल आणि गावाच्या पैठणीचा मान मिळवला.आणि बक्षीस समारंभ करून कार्यक्रम संपवण्यात आला.

याप्रसंगी शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि देशातील पाहिले शिव मंदिराचे संस्थापक डॉ. राजू चौधरी यांनी सुद्धा सोहळ्याला भेट देऊन आतकोली गावाचे आणि आयोजकांचे कौतुक केले.

No comments