web-ads-yml-728x90

Breaking News

मानवतावादी तत्वे हीच जीवनमार्ग यशस्वी करतील

BY - युवा महाराष्ट्र लाइव  मुरबाड,ठाणे

येथील शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान आणि गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय शिवळे, तत्त्वज्ञान विभाग व महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.19/2/22 रोजी राष्ट्रीय सेमिनार आयोजित केले होते. सेमिनारमध्ये संत कबीरांचे तत्वज्ञान या विषयावर दोन विषय तज्ञांची व्याख्याने आयोजित केली होती. 

या सेमिनारमध्ये डॉ. प्रकाश धुमाळ, शिवळे कॉलेज व डॉ. सुधा पंडित, महंत कबीर मंदिर पुणे, यांनी आपले चिंतनीय विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवळे कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. गीता विशे उपस्थित होत्या. धर्मामध्ये असणाऱ्या मतंतराला बगल देऊन भक्तीच्या मार्गाने समाजापर्यंत पोहोचता येते, तसेच त्या माध्यमातून मानवतावादी तत्त्वे शोधता येतात. मानवी जीवनामध्ये गुरुचे महत्व अनन्यसाधारण असते. गुरु शिवाय संत कबीर यांचे तत्वज्ञान पुढे जात नाही. असे विचार सेमिनार मध्ये मांडण्यात आले. संत कबीरांनी धर्मभेद, रूढी-परंपरा, कर्मकांड, व्रतवैकल्य, जात-पात कूलाभिमान यांना अजिबात थारा दिला नाही. त्यांनी समाजामध्ये असणाऱ्या विसंगतीवर सातत्याने हल्ले केले. समाजाला निश्चित असा भक्तीचा मार्ग दाखविला. या कार्यक्रमासाठी देशपातळीवरील लोक उपस्थित होते. सेमिनारचे प्रास्ताविक शिवळे कॉलेजचे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख व महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुनीलदत्त गवरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब मुळीक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. आभा बागाईतकर यांनी केले.

 

No comments