web-ads-yml-728x90

Breaking News

महाड पूर निवारण कार्यवाहीचा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

महाड पूर निवारणासाठीच्या कार्यवाहीची गतिमानता वाढविण्यासाठी उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.रायगड जिल्ह्यातील महाड येथे सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. भविष्यात अशा परिस्थितीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच पूर निवारणासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यासाठी पूरनिवारण समिती, आयआयटी (मुंबई) जलसंपदा विभाग, कोकण रेल्वे, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, सार्वजनिक बांधकाम या विभागांची संयुक्त बैठक दि. 4  फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी केलेल्या कार्याचा प्रगती अहवाल यासंदर्भात बैठकीत आढावा घेण्यात आला.या बैठकीस खासदार सुनील तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप,  मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. अमितकुमार सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड  उपस्थित होते.

No comments