web-ads-yml-728x90

Breaking News

ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

ज्येष्ठ गायक बप्पी लहिरी यांचे ( Bappi Lahiri Passes Away ) निधन झाले आहे. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते विविध आजारांनी ग्रस्त होते. निद्रानाशामुळे त्यांचे निधन ( Singer-composer Bappi Lahiri passes away at 69 ) झाल्याचे डॉक्टर दीपक नामजोशी सांगितले. आपल्या चाहत्यांमध्ये ते ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते. त्यांनी 70-80च्या दशकात अनेक लोकप्रिय चित्रपटांना संगीत दिले. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली. तसेच 'डिस्को डान्सर' या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली. तर भंकस नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ऐकायला मिळाले होते. आज त्यानी वयाच्या 69 वर्षी मुंबईत रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना झाल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बप्पी लाहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्रानी लाहिरी आणि त्यांची मुलगी गायिका रेमा लाहिरी बन्सल असे कुटुंब आहे. बप्पी लहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला होता. कलकत्ता येथे शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. वडील अपरेश लाहिरी हे प्रसिद्ध बंगाली गायक होते आणि त्यांची आई, बन्सरी लाहिरी संगीतकार आणि गायिका होत्या. त्या शास्त्रीय संगीत आणि श्यामा संगीतात पारंगत होत्या.

No comments