web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या पत्राद्वारे शुभेच्छा; स्वतंत्र संपादक पत्रकार संघटनेचे मुरबाड येथे राष्ट्रीय अधिवेशन मार्च मध्ये गुणवंतांचा सत्कार,पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते होणार....!

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

संपुर्ण भारत देशात पत्रकारिता आणि सामाजिकता म्हणुन कार्यरत असणा-या (NGO) ''स्वतंत्र संपादक पत्रकार'' संघाचे (SWATANTRA SAMPADAK PATRAKAR SANGH) राष्ट्रीय अधिवेशन ठाणे जिल्ह्यात मुरबाड येथे संपन्न् होत असून या अधिवेशनाला महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय माननीय भगतसिंग कोशारी यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या पुढील महिन्यात पार पाडत असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात गुणवंताचा सन्मान केला जाणार असुन मान्यवराच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार दिले जाणार आहेत. दोन दिवस चालणा-या या पत्रकारांच्या अधिवेशनाला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

          पत्रकाराच्या विविध समस्या शासन दरबारी पत्रकारांना न्याय विविध योजनाचा लाभ मिळावा तसेच देशात व राज्यात आरोग्य् शिक्षण, क्रिडा अन्य् उपक्रम राबवण्याचा संघटनेने निर्णय घेतला आहे. त्यावर चर्चा होऊन ठराव घेतले जाणार आहे.

          पत्रकाराच्या अनेक समस्येसाठी गेली अनेक वर्षे शासन दरबारी आम्ही पत्रव्यवहार मोर्चे आंदोलने द्वारे भांडत आलो आहोत. त्यातील अनेक समस्यांना न्याय मिळत आहे. यापुढे पत्रकारांना व त्यांच्या कुटूंबियांना शासनाकडुन विविध विषयावर चर्चा करून शासनाला ठराव पाठवले जाणार आहेत.

          मंत्री , लोकप्रतिनिधी सामाजिक , राजकीय , उद्योग , व्यवसाय , शिक्षण , आरोग्य् , प्रशासन , पत्रकार , शेतकरी , कष्टकरी , गायक , लेखक , पदाधिकारी अशा सर्वच क्षेत्रातील गुणवंतांचा , कर्तबगार अधिका-यांचा पुरस्कार देवून सन्मान केला जाणार आहे.

          राष्ट्रीय स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिवेशनात उपस्थित राहावे. आपला जिल्हा तालुका शहरातील माहिती संकलन करून अधिवेशनात प्रकाशित होणा-या विशेषांकात प्रसिध्द् करण्यासाठी तात्काळ पाठवावी असे आहवान राष्ट्रीय सचिव गौरव शेलार , संपर्क प्रमुख अफसर शेख , निलेश जोशी , संतोष चाळके , आण्णा पंडित , निलेश अनुभवणे , अजित इंगळे , मन्साराम वर्मा , वसंत भगत , मिलिंद दळवी , किशोर पाटील यांनी केले आहे .

No comments