web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यपालांच्या हस्ते मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान;माजी मंत्री गणेश नाईक महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि ९) विविध क्षेत्रात्रील मान्यवरांना मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार राजभवन येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.मिड-डे वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला अमृता देवेंद्र फडणवीस व मिड-डेचे व्यवसाय विस्तार प्रमुख राहुल शुक्ला प्रामुख्याने उपस्थित होते.राज्यपालांच्या हस्ते सर एच एन रिलायंस फाउंडेशन हॉस्पिटल, एसआरसीसी बाल रुग्णालय, झायनोवा शालबी हॉस्पिटल व इतर संस्थांना यावेळी मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.माजी मंत्री गणेश नाईक, अभिनेत्री पायल घोष, प्लॅनेट मराठी ओटीटीच्या सौम्या विळेकर यांसह ३० व्यक्ती व संस्थांना राज्यपालांच्या हस्ते मिड-डे महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आले.

No comments