web-ads-yml-728x90

Breaking News

शिवसेनेचा मला मारण्याचा हेतू होता; किरीट सोमैयांची प्रतिक्रिया

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात ( Pune Covid Hospital Scam ) पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी महापालिकेत गेलेल्या किरीट सोमैया ( Shivsainik Attack On Kirit Somaiya ) यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली व त्यात ते जखमी झाले. याबाबत बोलताना किरीट सोमैया यांनी ( Kirit Somaiya Spoke About Shivsena Attack ) शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता व त्याबाबत त्यांनी ट्विटरवर एकव्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. त्यामध्ये एक दगड त्यांना मारण्यासाठी उचलण्यात आला होता, असे दिसते. भाजप नेते किरीट सोमैया ५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेचारच्या सुमारास पुणे महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन देण्यासाठी येणार होते. याची कुणकुण शिवसैनिकांना लागल्याने असंख्य शिवसैनिक महापालिकेत उपस्थित झाले होते. याप्रसंगी सोमैया यांना घेरण्याचा प्रयत्नात असलेल्या शिवसैनिकांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यामध्ये सोमैया पायरीवरून खाली पडल्याने जखमी झाले होते.

No comments