web-ads-yml-728x90

Breaking News

आमच्या बातमीची दखल ; आणखी २ बोगस डॉक्टर अटक

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड ,ठाणे

गेल्या ४ वर्षापासून पत्रकार कुणाल नामदेव शेलार हे मुरबाड तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर वारंवार पत्रव्यवहार करून बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यातच मुरबाड तालुक्यातील धसई येथील शिपाईतून बोगस डॉक्टर झालेल्याच्या हातून जे कृत्य घडले त्यानंतर आम्ही घडलेल्या घटनेसंदर्भात व बोगस डॉक्टराला कवच कोणाचे ? या घटणेला जबाबदार कोण प्रशासक कि बोगस डॉक्टर ? अशा मालिकेतुन प्रश्न विचारले होते त्या बातमीची अखेर राज्याचे पारदर्शक आरोग्यमंत्री यांनी दखल घेतली असल्यानेच तालुका प्रशासन व प्रशासक आता खडाडून जागे झाले आहे आणि त्यामुळेच टोकावडा हद्दीत आणखी २ बोगस डॉक्टराला अटक करण्यात आली आहे.आमची बातमी खोटी नसते सत्य मांडणारी असते हे सर्वांच्या निदर्शनास आले आहे.कालच्या धाडीत सदरहू आढळून आलेल्या बोगस डॉक्टरांपैकी एका डॉक्टरांवर पहिले देखील गुन्हा दाखल असल्याची सुत्रांकडून कळत आहे.त्यातच आमच्या बातमी समवेत तक्रारीची व निवेदनाची देखील आता प्रशासक दखल घेऊ लागली असल्याचे या धाडी सत्रावरुन सिध्द झाले आहे.गेले कित्येक महिने,वर्षे लिखाण झाले परंतु दखल घेण्यात आली नव्हती परंतु आता जीव गेल्यानंतर प्रशासक अधिकारी झोपेतून जागे झाले असल्याचे या कारवाईतुन म्हणावे लागेल.मुरबाड तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाटावर आता संक्रात येत असून लवकरच बोगस डॉक्टर तालुक्याच्या नकाशावरुन हद्दपार होण्यास सुरुवात झाली असल्याचे या धाड सत्रातुन दिसुन येत आहे.याच बोगस डॉक्टरांकडे कोणत्या कंपनी गोळ्या देते व इंजेक्शन कुठून उपलब्ध होते,त्या डॉक्टरांची नोंद आहे कि नाही,रजिस्टर आहेत का ? यांची देखील चौकशी आरोग्यमंत्री यांनी करावी.यासंदर्भात जे कोणी तपासात येतील त्यांच्यावरही तात्काळ कारवाई होण्याची मागणी करण्यात येत आहे.आमच्या बातमीची दखल आरोग्य विभाग मुरबाड,बोगस डॉक्टर पथक यांनी तात्काळ घेतली असून त्यांचे या कारवाईला अनेक सामाजिक संघटना पाठिंबा देत आहे.

No comments