web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडच्या बोगस डॉक्टराना आरोग्य अधिकाऱ्यांचा कवच....?BY :- गौरव एन.शेलार,युवा महाराष्ट्र लाईव्ह - मुरबाड,ठाणे

 " जे लिहिले तेच घडले " असून गेल्या ४ वर्षापासून पत्रकार कुणाल नामदेव शेलार हे मुरबाड तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर वारंवार मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी ठाणे,उपसंचालक मुंबई मंडळ,जिल्हा आरोग्य विभाग ठाणे यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी,मुरबाड तहसीलदार यांना पत्रव्यवहार करून बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु अधिकारीवर्ग सुस्तीने वागत असल्यानेच मुरबाड तालुक्यातील धसई येथील शिपाईतून बोगस डॉक्टर झालेल्याच्या हातून त्या व्यक्तींचा जीव गेल्याने सिद्ध झाले आहे.विविध बातम्या आल्या,विविध निवेदन देण्यात आली,विविध पत्रासोबत माहिती अधिकार देण्यात आले परंतु दखल न घेतल्याने त्या निष्पाप व्यक्तींच्या जीवाला जबाबदार नक्की कोण अधिकारी कि बोगस डॉक्टर याचाच बोध होणे आत्ताच्या घडीला कठीण झाले आहे.अधिकारीवर्ग खुर्चीत बसून केवळ पत्रव्यवहार स्वीकारते परंतु प्रत्यक्षात पाहणी तपास यंत्रणा सक्षम नसल्याने शासनाचा पगार घेत असून तक्रारदाराकडूनच खुर्चीत बसून बोगस डॉक्टरांचे नाव सांगा असे सांगितले जाते असे असेल तर मग तक्रारदाराला त्या अधिकारी कमिटी वर्गाणी त्यांचा पगार व खुर्ची चे अधिकार द्यावेत आणि अधिकारी वर्गाने घरी बसावे असेच म्हणायची वेळ आज आली आहे.

मुरबाड तालुक्यात खाजगी हॉस्पिटल व क्लीनिक यांची एकूण संख्या ६२ आहेत त्यापैकी १७ जणांकडे बायो मेडिकल सर्टिफिकेट असून इतर जणांकडे नसल्याची माहिती मिळत आहेत त्यामध्ये काही बोगस डॉक्टरांची नावे असल्याचा संशय आहे.यामध्ये अधिकारी वर्गाचे साटेलोटे असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी बोगस डॉक्टर मीटिंग घेतली होती त्या मिटिंग मध्ये ३० बोगस डॉक्टरांची ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये व्यवसाय बंद असल्याची माहिती देऊन एकही बोगस डॉक्टर कार्यान्वित नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले होते परंतु वास्तविक पाहता ऑक्टोंबर अखेरपर्यंत मुरबाडचे काही बोगस डॉक्टर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रेंगे यांच्या तपासी यंत्रणेत आढळून आले नसल्याने त्यांच्या ३ महिन्यातच मुरबाडमध्ये शिपाईचा बोगस डॉक्टर झालेला आहे.प्रशासन-प्रशासक कुचकामी ठरला असून पत्रकार कुणाल शेलार यांच्या सोबतीत श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भाऊ भोईर, दशरथ भाऊ भालके,मुरबाड तालुकाध्यक्ष पंकज वाघ,महेश वाघ यांनी देखील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मागील मुरबाड तहसील कार्यालय येथे छेडण्यात आलेल्या आंदोलन वेळी शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये केली होती परंतु त्यांची सुद्धा दखल घेतली नाही तेव्हा पंचायत समिती गटविकास अधिकारी देखील हजर होते परंतु नोंदवहीत लिखाण झाले त्यातच कारवाईचा लेखाजोखा तसाच कागदावरच राहिला.दोन दिवसापूर्वी धसई येथील घडलेल्या घटनेत शिपाईतून घडलेल्या बोगस डॉक्टरांवर तात्काळ गुन्हा दाखल करावे असा प्रथम आवाज नारा श्रमजीवी संघटनेनेने लावला असून बाळाराम भाऊ भोईर, दशरथ भाऊ भालके यांच्या अधिपत्याखाली मुरबाड तालुकाध्यक्ष पंकज वाघ,महेश वाघ व अन्य सर्व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी टोकावडे पोलिस ठाण्यात जाऊन सदरहू शिपाईतून झालेल्या बोगस डॉक्टर याचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच तात्काळ गुन्हा दाखल न केल्यास अन्यथा रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता,तेव्हा या घटनेची तात्काळ दखल घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


          आजही बोगस डॉक्टर मुरबाड तालुक्यात वावरत असून तालुक्यातून कारवाई होणे वाटत नसून मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री यांनी त्यांच्या कार्यालयातून स्वतंत्र पथक नेमून बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पारित करावेत तसेच तालुक्यात बोगस डॉक्टर,लुटमारी डॉक्टर विनापरवानगी दवाखाने, क्लिनिक,कंपनीच्या फंडातून अफरातफर करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करावी त्याच बरोबर या कारवाई दरम्यान दवाखाने-डॉक्टरांना काळ्या यादीत समाविष्ट करून संबंधित अधिकाऱ्यांचीही सी.बी.आय मार्फत चौकशी करून बोगस डॉक्टर कमिटी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच मुरबाड शहरासह तालुक्यात विनापरवानगी लूटमार करणारे दवाखान्यावर शोध न घेता कारवाई झाली नसून त्यांना कोणाचे कवच आहेत ? याची देखील चौकशी करावी अशी मागणी पत्रकार कुणाल शेलार यांनी महाराष्ट्राचे पारदर्शक मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

No comments