web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यपाल कोश्यारी शिर्डी साई चरणीBY :- गौरव एन. शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह - शिर्डी

राज्यपाल कोश्यारी हे दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मात्र ऐनवेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अहमदनगर दौऱ्यात बदल करण्यात आला. शनिशिंगणापूर ऐवजी अगोदर शिर्डी दौरा त्यांनी केला आहे.त्यानंतर ते शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. राज्यपालांच्या दौऱ्यानिमीत्त पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.दरम्यान त्यांचा शनीशिंगणापूर दौरा रद्द करण्यात आला. ते रविवारी साई दर्शन घेऊन शिर्डी मुक्कामी राहणार असून उद्या सकाळी पुन्हा दर्शन घेऊन त्रंबकेश्वरकडे रवाना होतील, अशी माहिती देण्यात आली आहे

No comments